महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृती दिना निमीत्त आज निगडी येथे अभिवादन..

प्रतिनिधी-पिंपरी चिंचवड भीमशक्ती विद्यार्थी आघाडी, पिंपरी चिंचवड कमिटीच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या स्मृती दिना निमीत्त आज निगडी येथील राजरत्न बुध्द विहार या ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
यावेळी भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज गायकवाड यांच्या हस्ते माता रमाई यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी वंचीत बहुजन आघाडीचे नेते श्री.रजनीकांत क्ष्रिरसागर, भीमशक्तीचे नेते श्री. गौतम गायकवाड, लढा युथ मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद क्षिरसागर, निगडी परिसरातील ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते शिवपुत्र निंबाळकर, पंचशील भजनी मंडळाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत गायकवाड, राजरत्न बुध्द विहाराचे संस्थापक श्री. शिवशरण हिप्परगीकर, श्री. अशोक संगोळकर, भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष परमेश्वर निसरगंध, पिंपरी चिंचवड संघटक विशाल भाऊ केंगार, भीमशक्ती निगडी शाखा अध्यक्ष रवि अल्लापुर, धीरजकुमार मगी, लहू साळुंखे, अमोल शिनगारे, निगडी मधील ज्येष्ट कार्यकर्ते रामचंद्र गायकवाड, मरीआप्पा भंडारे, आदी कार्यकर्ते तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी सामुहिक बुध्द वंदना घेऊन अभिवादन केले.
तसेच भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. सुरज गायकवाड, वंचीत बहुजन आघाडीचे नेते श्री.रजनीकांत क्ष्रिरसागर,लढा युथ मुव्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रमोद क्षिरसागर, यांनी माता रमाई यांना अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button