गून्हापिंपरी-चिंचवडपोलिसमहाराष्ट्रविशेषसामाजिक

अल्पवयीन पीडितेवरील लैंगिक अत्याचार प्रकरणात आरोपीस २० वर्षांची सक्त कारावासाची शिक्षा.

प्रतीनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ सप्टेंबर २०२६ एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि. नं. 181/2026, बीएनएस कलम 64(1), 65(2), 74, 351 तसेच POCSO Act कलम 4, 6, 8 अन्वये दाखल गुन्ह्यात मा. एस. एन. यादव, विशेष व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पिंपरी चिंचवड जिल्हा सत्र न्यायालय यांनी आरोपी रामू कुंजल निसाद, वय 40 वर्षे, रा. शंभू कॉलनी, विनायक नगर, मोशी यास दोषी ठरवून 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्हा दिनांक 03/04/2026 रोजी एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीमती चैत्राली भिसे यांनी करून तपास पूर्ण केल्यानंतर 30 दिवसांच्या आत मा. न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात होऊन दिनांक 22/09/2026 रोजी मा. न्यायालयाने निकाल जाहीर केला.

न्यायालयाने सुनावलेली शिक्षा

– BNS कलम 64(1) – 20 वर्षे कारावास व ₹10,000/- दंड; दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास.

– BNS कलम 65(2) – 20 वर्षे कारावास व ₹10,000/- दंड; दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास.

– BNS कलम 74 – 3 वर्षे कारावास व ₹10,000/- दंड; दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावास.

– BNS कलम 351 – 3 वर्षे कारावास व ₹10,000/- दंड; दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावास.

– POCSO Act कलम 4 – 20 वर्षे कारावास व ₹10,000/- दंड; दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास.

– POCSO Act कलम 6 – 20 वर्षे कारावास व ₹10,000/- दंड; दंड न भरल्यास 3 महिने अतिरिक्त कारावास.

– POCSO Act कलम 8 – 5 वर्षे कारावास व ₹10,000/- दंड; दंड न भरल्यास 1 महिना अतिरिक्त कारावास.

वरील सर्व शिक्षा एकत्रित भोगावयाच्या आहेत.

सदर प्रकरणात विशेष सरकारी अभियोक्ता श्रीमती स्मिता मुकुंद चौगुले यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावी बाजू मांडली. तसेच कोर्ट पैरवी अधिकारी मपोहवा एस. आर. सरसे यांनी न्यायालयीन कामकाजात प्रभावी समन्वय साधला.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. सारंग आवाड, अपर पोलीस आयुक्त (प्रादेशिक) डॉ. बसवराज तेली, पोलीस उपआयुक्त, परिमंडळ-३, श्री. मारुती जगताप, सहायक पोलीस आयुक्त श्री. सुधाकर यादव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन, श्री. गणेश जामदार तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे), श्री. भोजराज मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये कायदेशीर प्रक्रिया प्रभावीपणे राबवून दोषींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button