उत्सवमनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

‘प्रेमोत्सव २०२५’ – एका दशकाचा प्रवास प्रेम, संघर्ष आणि अधिकाराचा!

प्रतिनिधी पुणे दि. १४ फेब्रुवारी २०२५ प्रेमाला जात, धर्म, लिंग आणि वर्गाच्या भिंती नकोत, तर स्वातंत्र्य हवं! याच ध्येयाने कार्यरत ‘राईट टू लव्ह’ च्या वतीने यंदाही ‘प्रेमोत्सव २०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा विशेष सोहळा “व्हॅलेंटाईन डे” दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत बाळगंधर्व पोलीस चौकी शेजारी, जे. एम. रोड, पुणे येथे संपन्न होणार आहे.

प्रेमाचा उत्सव – विचार, संगीत, कविता आणि अनुभूतींनी भारलेली संध्याकाळ!
‘प्रेमोत्सव’ हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर प्रेमाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू असलेल्या संघर्षाचा उत्सव आहे. गेल्या दहा वर्षांपासून ‘राईट टू लव्ह’ च्या माध्यमातून प्रेमाच्या अधिकारासाठी लढणाऱ्या प्रेमवीरांचा हा प्रवास थोडक्यात मांडण्याचा हा प्रयत्न आहे.
या संध्याकाळी प्रेमाची गाणी, हृदयस्पर्शी कविता, संघर्षमय प्रेमकथा, अनोख्या गप्पा, गेम्स आणि अनेक खास कार्यक्रम होणार आहेत. प्रेमस्वातंत्र्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी हा कार्यक्रम मोकळा आहे.
“प्रेमाला हक्क मिळवून देणाऱ्या प्रवासाची दहा वर्षं!”
‘राईट टू लव्ह’ ने गेल्या दशकभरात जात, धर्म, लिंग आणि वर्गाच्या भिंतींवर प्रहार करत असंख्य प्रेमी जोडप्यांना त्यांच्या हक्काचं प्रेम मिळवून देण्यासाठी संघर्ष केला आहे. समाजाच्या रूढी-परंपरांच्या विरोधात उभं राहून, प्रेमासाठी झगडणाऱ्यांना आधार देण्याचं हे कार्य अखंड सुरू आहे.
प्रेमोत्सवाची दखल घ्या – प्रेमाचा आवाज सर्वदूर पोहोचवा! असे अनहद सोशल फाउंडेशन – ‘राईट टू लव्ह’ चे के. अभिजित यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!