कलामनोरंजनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

नागपूरची तन्वी मेश्राम ठरली महाराष्ट्राची सौंदर्यवती 2.0 ची विजेती..

लॉलीपॉप इंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट यांचा महिला सन्मान उपक्रम

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड पुणे (दि. ३१ मे २०२४) महिलांच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि कॅलिस्टा पिजंट या संस्थेच्या वतीने “महाराष्ट्राची सौंदर्यवती स्पर्धा २०२४” या मेगा शो 2.0 चे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथे झालेल्या या सौंदर्य स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून गृहिणींसह वैद्यकीय, पोलीस, कला, संगणक शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
यामध्ये नागपूर ची कु. तन्वी मेश्राम यांनी प्रथम क्रमांक पटकावला. प्रथम क्रमांकाचा मुकुट, पंधरा हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र गतविजेत्या सई तापकीर, सुमिता काटकर आणि नैना वेदपाठक यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.
द्वितीय पारितोषिक मुंबईच्या पूनम सावंत यांना मुकुट, बारा हजार रुपये आणि तृतीय क्रमांक कू. निकिता हांगे यांना मुकुट, दहा हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. इतर सर्व सहभागी स्पर्धकांना सोन्याची नथ, पैठणी आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
लहान मुलांच्या गटात प्रथम पारितोषिक पुण्यातील कू. अनविका मोरे दहा हजार रोख आणि द्वितीय पारितोषिक औरंगाबादच्या सात हजार रोख कू. वेदिका मुंढे आणि तृतीय पारितोषिक पाच हजार रुपये रोख रक्कम तळेगाव दाभाडे येथील कू. दुर्वा शेटे यांनी पटकावले.
परीक्षक म्हणून नैना वेदपाठक, गतविजेत्या सई तापकीर, प्रा. सूमिता काटकर यांनी काम पाहिले. ग्रूमिंग नरेश फुलेलू , क्षितिज गायकवाड आणि स्मिता महादेव यांनी केले. आऊटफिट कांचन सांडभोर आणि रिवाज रेंटल च्या चैत्राली मरळीकर पाटोळे यांनी केले. वेशभूषा आणि केशरचना नेहा ठाकूर यांनी केली. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ विमा सल्लगर गणपत शिंदे आणि प्रेरणा शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य राजकुमार सरोदे उपस्थित होते.
स्वागत लॉलीपॉप इंटरटेनमेंट संचालक संजीव जोग, सूत्र संचालन रेडिओ जॉकी आर. जे. बंड्या यांनी केले. आसावरी कुलकर्णी – बोडस यांनी आभार मानले. शिल्पा मगरे गाडेकर, सारिका डोलणारे आणि प्रीती वाघमारे यांनी संयोजनात सहभाग घेतला.
महाराष्ट्राची सौंदर्यवती या स्पर्धेत पारितोषिक वितरण प्रसंगी डावीकडून सई तापकीर, नैना वेदपाठक, कशिश आकरे, पूनम सावंत, तन्वी मेश्राम, सुमिता काटकर , निकिता हंगे, पुनम सोनवणे, पुष्पा लटके, संजीव जोग.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!