ग्रेप कौटी परिसरात रंगला थरारः कारचालकांच्या कसरतीने फेडले डोळ्याचे पारणे..

गौरव गिल,अर्जुन राव,अमरजित घोष यांच्यात विजेतेपदासाठी चुरस
प्रतिनिधी रेणूका गायकवाड, महाले नाशिक दि. ३१ मे २०२४ नाशिक ब्लु बॅंड स्पोर्टस् आयएनआरसी २०२४ च्या रॅली ऑफ महाराष्ट्रच्या विजेतेपदासाठी नामांकित कारचालक गौरव गिल, अर्जुन राव, अमरजित घोष यांच्यात विजेतेपदासाठी चुरस निर्माण झाली आहे. आपल्या नव्या अद्यावत गाडीसह रॅलीत सहभागी झालेल्या गौरवने पुन्हा एकदा वर्चस्व राखत भरारी घेतली. विजेतेपदाचे प्रमुख दावेदार अर्जुन राव, कर्णा कादूर, अमरजित घोष हे पुढील दोन दिवसात कशी कामगिरी बजावतात यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे.
खास प्रेक्षकांसाठी ग्रेप कौटी हॉटेलच्या परिसरात आज दोन किलोमिटरच्या सुपर स्पेशल स्टेजने (एसएसएस) सुरवात झाली. पालघरचे आमदार सुनिल भुसारा, सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष रविंद्र सपकाळ, ब्लु बॅंडचे प्रेम काशीनाथ, आयकर सहाय्यक आयुक्त जसकंवल बीरसिंग, पोलिस निरिक्षक श्री. गीते, ग्रेप कौंटीचे संचालक तेजस चव्हाण, माय एफएमचे स्टेशन हेड शांकी पहाडे आदींनी विविध गटाच्या कारला झेंडा दाखवत रॅलीचे औपचारिक उद्घाटन केले. या रॅलीत यंदा तब्बल ५३ प्रवेशिका नोंदविण्यात आल्या आहे. त्यात ५ महिला संघाचाही सहभाग आहे.
कारचालकांच्या थरारक कसरती अन् प्रेक्षकांची दाद
ग्रेप कौटींच्या दोन किलोमिटरच्या परिसरात प्रेक्षकांनी दुपारपासूनच गर्दी केली होती. रॅलीसाठी लावण्यात आलेल्या बॅरकेटींगच्या बाजूंला उभे राहून येणाऱ्या प्रत्येक कारची छायाचित्रे टिपण्यात चालकांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देण्यास प्रेक्षकांचा दांडगा उत्साह दिसून आला. विशेषत गौरव गिल, कर्णा कादूर, अर्जुन राव, अमरजित घोष यांच्याबरोबरच महिला गटातील चालक प्रगती गौडा, हर्षिता गौडा, पुणेकर निकिता टकले यांच्या कार आल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांच्या नावाने हाक मारत तसेच व्हि फोर व्हिक्टरी करत त्यांना प्रोत्साहन दिले. प्रेक्षकांचा शेवटची कार जाण्यापर्यत उत्साह दिसला. उद्या (ता.१) अंबोली, जव्हार, मोखाडा, पालघर या डोंगरदऱ्याच्या परिसरात रॅली होणार आहे.
आजचा निकाल असा- प्रथम, द्वितीय तृतीय या क्रमाने
ओव्हरऑल चॅम्पियन गट
गौरव गिल (१मि. ३४ सेकंद), अरोर अर्जुन राव-(१मि. ४० सेंकंद), अमरजित घोष-(१मि. ४२ सेकंद)
आएनआरसी टू गट
जेसन संल्डाना-(१ मि.४५ सेकंद), प्रगती गौडा-(१ मि.४६ सेकंद), फिलिपोस मथ्याय-(१ मि.४६ सेकंद)
आएनआरसी थ्री गट
अर्णव प्रताप सिंग-(१ मि.४४ सेकंद), अर्जुन राजीव-(१ मि.४७ सेकंद), वेणूनाथ व्ही- (१मि.४७ सेकंद७७)
जिप्सी चॅलेंज गट
संजय अग्रवाल-(२ मिनिटे), डॉ.आकर्ष सुंदर-(२ मि.३ सेकंद), बलजिरदरसिंग धिल्लन-(२ मि.४ सेकंद)
क्लासिक गट
प्रविण द्वारकानाथ-(२ मि.५ सेकंद), अनिहनाथ एस-(२ मि.८ सेकंद), शेख हुसेन पाशा (२ मि.१३ सेकंद)

