आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

महामानवांवर बेताल वक्तव्यकरणार्‍या राहुल सोलापूरकर या वाचाळविरावर देशद्रोह व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा-सूरज गायकवाड

प्रतिनिधी पूणे कोथरूड दि. १० फेब्रुवारी २०२५ छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या अभिनेता राहुल सोलापूरकर याच्यावर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावे याबाबत भीमशक्ती संघटनेच्या वतीने राहुल सोलापूरकरच्या घरावर कोथरूड येथे भिम शक्ती संघटना पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष विजय हिंगे यांच्या नेतृत्वामध्ये निषेध ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी भिम शक्ती पिंपरी चिंचवड युवक अध्यक्ष सूरज गायकवाड, शंकर साखरे, आदित्य साखरे, आनंद जगताप, विजय ओव्हाळ, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भिम शक्ती संघटनेच्या वतीने राहुल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोह व ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भीमशक्तीच्या वतीने करण्यात आली..
सदरील आंदोलनाला प्रतिसाद देत कोथरूड पोलीस स्टेशनच्या वतीने पीआय देशमाने साहेब यांनी येणाऱ्या ४८ तासात सदरील प्रकरणाची चौकशी करून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर भीमशक्तीचे सदरील आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. जर पुढील ४८ तासात राहुल सोलापूरकर वर पुन्हा दाखल करण्यात आला नाही तर भीमशक्तीच्या वतिने सदरील आंदोलन हे तीव्र अति तीर्व करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!