चार महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव भोसरीत साजरा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २९ स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ, महिलांसाठी प्रथम शाळा सुरु करणार्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा बीबी शेख, पहिल्या दलित शिक्षिका मुक्ता साळवे या चारही महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव २८ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आला. गेले चार वर्षांपासून हा संयुक्त जयंती महोत्सव सोहळा साजरा करण्यात येत आहे त्या निमित्ताने दरवर्षी मोफत अन्नधान्याचे वाटप करण्यात येते या ही वर्षी रविवारी दिं २८ जानेवारी २०२४ रोजी संयुक्त जयंती महोत्सव निमित्ताने धान्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भोसरीतील डॉ. सुरेखा साबळे, डॉ. सुहास कांबळे, मा. प्रियंकाताई बारसे शिवसेनेचे उपशहरप्रमुख राहुल गवळी, मुक्कावार सर, संभाजी ब्रिगेडचे प्रविण कदम, सामाजिक कार्यकर्ते महंमद मुलाणी, शाह जमातचे अध्यक्ष अतहर शाह, कॉंग्रेस पार्टीचे नेते चंद्रकांत लोंढे अदींनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे आयोजन सलोखा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष हरिश डोळस, शाह जमात शान ए फकीर फाऊंडेशनचे संस्थापक मोहसीन शाह यांनी केले. याप्रसंगी दोन्ही फाऊंडेशनचे पदाधिकारी सौ. अनिता डोळस, आयेशा शाह, महेकताई शाह, हारुनभाई शेख, अंकुश काळे, कपिल डोळस, अनिल रोकडे, रविंद्र पवार आदींनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.




