अनिलराव आदमने पाटील यांचे मराठा-राजपूत समाजाला मोठे आवाहन: हक्कांसाठी श्रीरामपूर महामेळाव्यात येण्याचे आवाहन!

प्रतिनिधी श्रीरामपूर दि. ०२ डिसेंबर २०२५ राजपूत आणि मराठा समाजातील बांधवांनी आपल्या न्यायी हक्कांसाठी एकत्र येऊन आगामी राजपूत-मराठा क्षत्रिय महामेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अनिलराव आदमने पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण क्षत्रिय समाजाला त्यांनी हे आवाहन केले आहे.
हा महामेळावा श्रीरामपूर (पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर) येथे आयोजित करण्यात आला असून, याला आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले पाटील आणि क्षत्रिय करणी सेनेचे संस्थापक डॉ. राज शेखावत यांनी पुढाकार घेतला आहे.
आयोजकांनी ठामपणे सांगितले आहे की, या महामेळाव्यातून मांडण्यात येणाऱ्या मागण्या सरकारला मान्य कराव्याच लागतील. अनिलराव पाटील यांनी आपल्या आवाहनात संपूर्ण क्षत्रिय समाजाने आपली शक्ती दाखवण्यासाठी आणि सामूहिक मागण्यांसाठी आवाज उठवण्यासाठी या ऐतिहासिक मेळाव्यात सहभागी होण्याचे महत्त्व अधोरेखित
केले आहे.



