आपत्कालपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

दुर्गा देवी टेकडी परिसरात बिबट्याचा वावर; वन विभागाची शोधमोहीम सुरू – नागरिकांनी सावधगिरी बाळगावी: युवराज दाखले यांचे आवाहन

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड, दि. ०७ मे २०२६ दुर्गा देवी टेकडी व लगतच्या परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवशाही व्यापारी संघाचे संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.
“दुर्गा देवी टेकडीवर फिरायला जाणारे नागरिक, मॉर्निंग वॉकर्स आणि लगतच्या वसाहतीतील रहिवाशांनी पुढील काही दिवस विशेष सावधगिरी बाळगावी. लहान मुले व वृद्धांनी एकटे टेकडी परिसरात जाऊ नये,” असे युवराज दाखले म्हणाले.
वन विभाग व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडे युवराज दाखले यांच्या मागण्या:
१) बिबट्याला पकडण्यासाठी तात्काळ शोधमोहीम तीव्र करा* व पिंजरे लावा.
२) टेकडी परिसरात 24×7 वन विभागाचे पथक* तैनात करा.
३) नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर जाहीर करा व दवंडी देऊन जनजागृती करा.
४) टेकडीवर जाणारे सर्व रस्ते तात्पुरते बंद करा व सूचना फलक लावा.
५ ) पाळीव प्राण्यांना घराबाहेर मोकळे सोडू नका, असे आवाहन नागरिकांना करावे.

“वन विभागाच्या टीमने शोधमोहीम सुरू केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. बिबट्या दिसल्यास त्याला डिवचू नये व तात्काळ वन विभागाला कळवावे,” असे आवाहन युवराज दाखले यांनी केले आहे.

या संदर्भात महत्त्वाचे संपर्क क्रमांक
वन विभाग हेल्पलाईन: 1926
पिंपरी-चिंचवड अग्निशमन: 101

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!