देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
७६वा स्वातंत्र्य दिन पंचशिल संघ बूद्धविहार संततूकाराम नगर पिंपरी येथे साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ७६ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त १५ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी तिरंगा ध्वज फडकवून मानवंदना देण्यात आली व नंतर लाडू वाटण्यात आले. तसेच विहारात बुध्द वंदना घेण्यात आली, नंतर मान्यवर उपासकांनी आपले मनोगत व्यक्त केली यावेळी आर. पी. आय. चे मा. रमेश चिमूरकर यांनी आपल्या मनोगतात जयभीमचा उच्चार केला केला की एक प्रकारची चेतना, ऊर्जा निर्माण होते तसेच विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या देशाची ऊर्जा आहेत, म्हणून कवी म्हणतात..
“आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे, वादळही रोखतो आम्ही भीमा तुझ्यामुळे” या गीताची आठवण करून देत रमेश चिमूरकर यांनी उपस्थित सर्वाना ७६ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.




