
प्रतिनिधी पूणे दि. १९ डिसूंबर २०२३ बहुजन समाज पार्टी देशातील तीन नंबर चा राष्ट्रीय पक्ष देशात कार्यरत आहे बसपाचे लोकसभेत १० खासदार व विविध राज्यामध्ये आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक व लोक प्रतिनिधी निवडून आले आहेत. भारतामध्ये लोकशाही आहे. येथे भारतीय घटनेनुसार भारताचे लोक सरकार निवडून देतात, या मुळे लोकशाही बळकट होते. परंतु काही वर्षा पासून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. ई. व्ही. एम. (EVM) वर लोकांचा विश्वास राहिला नाही तरी आगामी लोकसभा निवडणुका मतपत्रिकेवर घ्यावी. अशी मागणी बसपाच्या वतीने करण्यात आली आहे. बसपाचे जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी महंमद शफी यांनी निवडणूक अधिकारी यांना निवेदन सादर केले. यावेळी बसपाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.



