आंदोलनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणाचा लढा आता दिल्लीत!

प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. २५ जुलै २०२६ दिनांक ०५ ऑगस्ट २०२६ला जंतर-मंतरवर भूमिपुत्रांचा एल्गार; दि. बा. पाटील यांच्या नावासाठी निर्णायक आंदोलन
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीचा लढा आता महाराष्ट्रातून थेट दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे.
नवी मुंबई, पनवेल आणि परिसरातील भूमिपुत्रांनी आता दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. महाराष्ट्र सरकारकडून विमानतळाच्या नामकरणाबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील मंत्री आणि आमदारांकडूनही प्रक्रिया पूर्ण झाल्याचे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र, विमानतळाला अंतिम नाव देण्यासाठी केंद्र सरकारची मंजुरी आवश्यक असल्याने, आता आंदोलनाची दिशा दिल्लीकडे वळवण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेतला आहे.
“महाराष्ट्रातील प्रक्रिया पूर्ण, आता केंद्र सरकारकडून निर्णयाची प्रतीक्षा!”
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी हजारो शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. या विकासाच्या प्रवासात योगदान देणाऱ्या लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाला न्याय मिळावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे.
५ ऑगस्ट २०२६
चलो दिल्ली!चलो जंतर-मंतर!
दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासाठी भूमिपुत्रांचा आवाज आता राजधानीत घुमणार आहे.
भूमिपुत्रांचा सवाल स्पष्ट आहे
“राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला, आता केंद्र सरकारने निर्णय कधी घ्यायचा?”
नवी मुंबईच्या अस्मितेचा आणि भूमिपुत्रांच्या भावनेचा हा लढा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे.
काल घनसोली येथे दिबा रथयात्रा व दिल्ली जंतरमंतर आंदोलना बाबत चर्चा व नियोजन बैठक झाली अनेक भूमिपुत्र सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!