अभिनंदनमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छाशैक्षणिकसामाजिक

प्रा. डॉ. राजकुमार शेलार हे राजश्री शाहू पुरस्काराने सन्मानित..

प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर कळंब ता. इंदापूर येथील विश्वासराव रणसिंग महाविद्यालयातील मराठी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजकुमार शेलार यांना युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था. महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त देण्यात येणारा, राजकारण समाजकार्य, शिक्षण, शैक्षणिक कार्य इत्यादी मध्ये उल्लेखनीय व भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तींना दिला जाणारा राजश्री शाहू पुरस्कार २०२६ त्यांना प्रदान करण्यात आला. डॉ.शेलार यांनी भगवान इंगळे यांच्या ढोर या दलित आत्मकथनावर M.phil ही पदवी प्राप्त केली आहे. त्याचबरोबर ‘भटक्या विमुक्त जमातींची आत्मकथने: स्वरूप आणि चिकित्सा’ या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये Ph.D पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या ‘दलित आत्मकथने आणि भगवान इंगळे यांचे ढोर आत्मकथन’ या ग्रंथास “साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे राष्ट्रीय वाड्.मय पुरस्कार” लाभला आहे. राष्ट्र सेवा दल व इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने त्यांना पारितोषिक देऊन भव्य नागरी सत्कार केला आहे. त्यांच्या लेखनातून सामाजिक शैक्षणिक राजकीय, मार्गदर्शन मिळाले. त्यांनी केलेले संशोधन व साहित्याबद्दल त्यांना ज्येष्ठ विचारवंत,इतिहास संशोधक, व्याख्याते डॉ. श्रीमंत कोकाटे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी श्री. कैलास कदम सर प्रा.कृष्णा ताटे सर, आजी-माजी नगरसेवक, समाजसेवक व अनेक मान्यवर उपस्थित होते. सत्कार समारंभाला उत्तर देताना डॉ. शेलार म्हणाले की,”आज ‘राजश्री शाहू महाराज पुरस्कार’ स्वीकारताना माझे मन अत्यंत आनंद, अभिमान आणि कृतज्ञतेने भरून आले आहे. हा पुरस्कार माझ्यासाठी केवळ सन्मान नसून एक शिक्षक म्हणून प्राध्यापक म्हणून समाजाप्रती असलेल्या माझ्या जबाबदारीची जाणीव अधिक दृढ करणारा आहे. हा बहुमान प्रदान केल्याबद्दल युगप्रवर्तक श्री शाहू बहुउद्देशीय सेवा संस्था, महाराष्ट्र राज्य व या संस्थेचे अध्यक्ष पत्रकार श्री. शिवाजी शिंदे यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांनी समता, सामाजिक न्याय, शिक्षण आणि मानवतेचीजी मूल्ये समाजासमोर ठेवली, ती आजही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे, हीच त्यांना खरी आदरांजली आहे.
माझ्या शैक्षणिक, साहित्यिक वाटचालीत मला माझे आई-वडील, कुटुंबीय, गुरुजन, सहकारी, विद्यार्थी, मित्र आणि हितचिंतक यांचे अमूल्य सहकार्य लाभले. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली आहे. पुढील काळातही शिक्षण, संशोधन, साहित्यनिर्मिती आणि समाजहिताची कार्ये अधिक समर्पितपणे करण्याचा मी प्रयत्न करीन”.
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष श्री. प्रकाश कदम, सचिव श्री.वीरसिंह भैय्यासाहेब रणसिंग, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा.ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. प्रशांत शिंदे, सर्व प्राध्यापक व राजकीय सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी राजश्री शाहू पुरस्कार लाभल्यामुळे डॉ.राजकुमार शेलार यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!