पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

NCMC स्मार्ट कार्ड मोहिमेला निगडीत उत्स्फूर्त प्रतिसाद; ८९० नागरिकांनी घेतला लाभ..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ साप्टेंबर २०२६ प्रभाग क्र. १३, यमुनानगर, सेक्टर २२, साईनाथ नगर येथील नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे शहराध्यक्ष मा. श्री. सचिन चिखले व माजी नगरसेविका सौ. अश्विनी सचिन चिखले-मराठे यांच्या सौजन्याने अल्पदरात NCMC (National Common Mobility Card) स्मार्ट कार्ड योजना मोहीम राबविण्यात आली.

एसटी महामंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी हे स्मार्ट कार्ड बनवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. ही मोहीम मनसे जनसंपर्क कार्यालय, साईनाथ नगर येथे सलग ६ ते ७ दिवस राबविण्यात आली.

या मोहिमेला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सुमारे ८९० नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी ही मोहीम नियोजनबद्ध पद्धतीने राबविण्यात आली.

नागरिकांच्या मागणीचा विचार करून लवकरच पुन्हा एकदा ही मोहीम राबविण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.

या मोहिमेचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!