
प्रतिनिधी सतिश पाटील मुबंई दि. ०४ सप्टेंबर२०२६ गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि गणेश मंडळांमध्ये कायदा, सुव्यवस्था आणि समन्वय राखण्यासाठी संवाद बैठक दरवर्षी आयोजित केली जाते. या बैठकांचा मुख्य उद्देश सण शांततेत आणि उत्साहात साजरा करणे हा असतो. या बैठकांमध्ये प्रामुख्याने खालील मुद्द्यांवर चर्चा आणि निर्णय घेतले जातात. सुरक्षा व्यवस्था मंडळ परिसरात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवणे आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करणे.
ध्वनी प्रदूषण नियम: लाऊडस्पीकर आणि डीजे (DJ) च्या वापराबाबत शासकीय नियमांचे व वेळेचे पालन करणे. वाहतूक आणि गर्दी व्यवस्थापन: उत्सवादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मार्गांचे नियोजन करणे आणि आपत्कालीन रस्ते मोकळे ठेवणे.
विसर्जन मिरवणूक: विसर्जन मार्गांची निश्चिती आणि शांततेत मिरवणुका पार पाडणे.परवानग्या: मंडप उभारणी, वीज जोडणी आणि इतर आवश्यक शासकीय परवानग्यांची प्रक्रिया सुलभ करणे.
मुंबई आणि उपनगरमुंबई जिल्हा प्रशासनाच्या अधिसूचनेनुसार, यंदा गणेशोत्सवात एकूण ४ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत साऊंड/लाऊडस्पीकर वाजवण्यास परवानगी असेल. १५ सप्टेंबर (दीड दिवसांचे विसर्जन)१८ सप्टेंबर (पाचव्या दिवसाचे विसर्जन)१९ सप्टेंबर (गौरी विसर्जन)२५ सप्टेंबर (अनंत चतुर्दशी – मुख्य विसर्जन)इतर दिवशी नेहमीप्रमाणे रात्री १० वाजेपर्यंतच मर्यादा असेल. सर्व सार्वजनिक गणेश मंडळांना बृहन्मुंबई पोलिसांकडून सहकार्य व सुरक्षा दिली जाईल गणेश भक्तांनी नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. दरवर्षी पोलिसांकडून उत्कृष्टसजावट व शिस्तबद्ध मिरवणूक यासाठी पारितोषिक दिले जाते.
यावेळी पोलिस प्रशासनाची प्रमुख उपस्थिती होती यात श्री.धनंजय कुलकर्णी (भापोसे) अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मुंबई, श्री. अभयसिंग देशमुख (मपोसे) पोलीस उपायुक्त, श्री. गणेश शिंदे ( मपोसे) पोलीस उपायुक्त पूर्व परिमंडळ २ मुंबई, श्री. प्रदीप चव्हाण (मपोसे) वाहतूक शाखा पूर्व उपनगर



