उत्सवपिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

मराठा सेवा संघाने सामाजिक सलोखा जोपासावा : प्राचार्य रामकिशन पवार

मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड शहरात उत्साहात संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि ०५ सप्टेंबर २०२६ मराठा सेवा संघ गेली छत्तीस वर्षे राष्ट्रमाता जिजाऊंना आदर्श मानून शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराने कार्य करत आहे. मराठा समाजाच्या विविध मागण्यांचा पाठपुरावा करत असताना मराठा समाजास न्याय मिळावा तसेच इतर समाजावर अन्याय होणार नाही व सामाजिक सलोखा जोपासण्यासाठी पूर्वी प्रमाणेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यरत रहावे असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्राचार्य रामकिशन पवार यांनी केले.
मराठा सेवा संघाचा छत्तीसावा वर्धापन दिन मंगळवार दिनांक ०१ रोजी निगडी येथील संघाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ पूजन करून करण्यात आली. जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुलभा यादव यांनी जिजाऊ वंदना म्हणटली प्रास्ताविक प्रकाश जाधव यांनी केले यावेळेस सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर, अभिमन्यू पवार, अर्जुन खामकर, सुनिल जाधव यांनी मनोगते व्यक्त केली अध्यक्षीय भाषण शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांनी केले सूत्रसंचालन संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष प्रविण कदम यांनी केले या प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता मकरंद निकम, सामाजिक संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष सतिश काळे, वसंतराव पाटील, संपतराव जगताप, शंकरराव सावंत यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार साहेबराव साळुंखे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!