
प्रतिनिधी सतिश पाटील मुंबई दि. ०७ जून २०२६ काल देशात झालेले कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन हे केवळ एक साधेसुधे आंदोलन नसून, ही देशातील युवकांच्या मनातील तीव्र असंतोष व खदखद आहे. मोदी सरकारची चुकीची धोरणे आणि कोलमडलेली व्यवस्था यांविरोधात लोकांच्या मनात जी वर्षानुवर्षांची निराशा साचली होती, ती आज या युवकांच्या आंदोलनाच्या रूपाने रस्त्यावर आली आहे.
काल दिल्लीतील जंतर-मंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या माध्यमातून जो जनक्षोभ उठला आहे, त्यात देशातील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होतेय की देशात होणाऱ्या पेपरफूटी, बेरोजगारी, आणि यासारख्या असंख्य प्रश्नांमुळे आज देशातील युवकांचा या भ्रष्ट आणि अकार्यक्षम सिस्टिमवरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे.
हा युवकांचा आक्रोश आणि सिस्टिमविरोधातील संघर्ष फार काळ दडपून किंवा दाबून ठेवता येणार नाही. कारण जेव्हा देशातील तरुण सिस्टिमविरोधात एकवटतो, तेव्हां तो व्यवस्थेला बदलल्याशिवाय राहत नाही, हे शेजारीच असलेल्या नेपाळ आणि बांग्लादेशमधील उदाहरणांवरून पाहायला मिळाले आहे.
त्यामुळे सरकारने युवा शक्तीच्या आंदोलनाला हलक्यात न घेता, त्यांच्या मागण्यांची त्वरित दखल घ्यावी व त्यांना योग्य तो न्याय द्यावा.
एका सुशिक्षित तरूणाचे अंदोलन आता देशभरात पसरत आहे. आज पर्यंत कोणी नेतृत्व व पुढाकार घेत नव्हते. आता सुशिक्षित बेरोजगार तरूणाई हतबल होवून जेलमध्ये जाण्यास तयार जो पर्यंत सरकारला जाग येत नाही अंदोलन चालूच रहाणार! असल्याचे आंदोलन कर्त्यानीं सांगीतले.



