अभिनंदनमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरशैक्षणिक

विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना ‘लीडर ऑफ चेंज’ स्टार एज्युकेशन अवॉर्ड २०२६ प्रदान..

निमसाखर संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव; गोरेगाव, मुंबई येथे पुरस्कार सोहळा संपन्न..

प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर दि. १४ ऑक्टोबर २०२६ इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान, निमसाखरचे सचिव विरसिंह विश्वासराव रणसिंग यांना शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व, परिवर्तनशील कार्य आणि शैक्षणिक विकासातील योगदानाबद्दल प्रतिष्ठेचा ‘लीडर ऑफ चेंज अवॉर्ड – स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स २०२६’ प्रदान करण्यात आला. मुंबईतील गोरेगाव येथील नेस्को येथे ६ ते ८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आयोजित स्टार एज्युकेशन अवॉर्ड्स सोहळ्यात त्यांचा गौरव करण्यात आला.

शिक्षण क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली दूरदृष्टी, नेतृत्वगुण आणि शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न यांची दखल घेऊन रणसिंग यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानामुळे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या शैक्षणिक कार्याला नवी ओळख मिळाली असून परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे, शैक्षणिक संस्थांचा विकास करणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करणे या उद्दिष्टांना महत्त्व दिले जाते. या कार्याला प्रोत्साहन देणारा हा पुरस्कार संस्थेसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासासाठी कार्य करणाऱ्या संस्थांच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा रणसिंग यांनी व्यक्त केली. रणसिंग यांच्या या यशाबद्दल इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आनंदी रणसिंग, उपाध्यक्ष प्रकाश कदम, खजिनदार वीरबाला पाटील, विश्वस्त शंकरराव रणसिंग, कुलदीप हेगडे, राही रणसिंग व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि हितचिंतकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button