माय रमाई फाउंडेशन तळेगाव शहर अध्यक्षा पूनम उबाळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आदिवासी कातकरी महीलांना साड्या वाटपाचे आयोजन..

प्रतिनिधी तळेगाव मावळ दि. २५ ऑगस्ट २०२५ माय रमाई फाउंडेशन ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉ. अमर चौरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पाथरगाव या ठिकाणी माय रमाई फाउंडेशनच्या तळेगाव शहर अध्यक्षा पूनम समीर उबाळे यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी कातकरी समाजातील महीलांना साड्या वाटप व कार्यक्रमास उपस्थित सर्वांना (अन्नदान) भोजन समारंभ दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताजे पाथरगाव पिंपळोलीचे उपसरपंच सिद्धार्थ चौरे असणार आहेत कार्यक्रमाचे प्रस्ताविक कविवर्य बाळासाहेब सोनवणे करणार आहेत सूत्रसंचालन सुनील चौरे शाखाध्यक्ष आर. पी. आय. पिंपळोली हे करणार आहेत आभार प्रदर्शन शशिकांत चौरे आणि उपसरपंच संदीप चौरे करणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन मावळ तालुका युवक अध्यक्ष समीरभाऊ उबाळे यांनी केले आहे. तसेच कार्यक्रमासाठी माय रमाई फाउंडेशन ट्रस्टचे आधारस्तंभ विशालभाऊ वाघमारे फुले शाहू आंबेडकर मंच संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, युवक आर. पी. आय. अध्यक्ष पुणे जिल्हा समीरभाऊ जाधव, आर. पी. आय अध्यक्ष तळेगाव शहर संदीपजी शिंदे, ताजे गावचे पोलीस पाटील अरुण भाऊ केदारी, कान्हेचे सरपंच उद्योजक तसेच प्रसिद्ध बैल गाडा मालक प्रदीप शेठ ओव्हाळ, चंद्रजीत भाऊ वाघमारे नगराध्यक्ष वडगाव मावळ, विवेकभाऊ शिंदे युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, निलेश डोळस सामाजिक कार्यकर्ते, रामदासजी बावस्कर सामाजिक कार्यकर्ते, दिपालीताई मानकू बोंबले (पोलीस पाटील पिंपळोली), अरुण केदारी (पोलीस पाटील ताजे), संदीप बालगुडे (पोलीस पाटील पाथरगाव), विकास केदारी
(ग्रामपंचायत सदस्य पाथरगाव), निलम सुतार (मा. सरपंच विद्यमान सदस्य ताजे), ताईबाई हिरामण केदारी (विद्यमान सरपंच ग्रुप ग्रामपंचायत ताजे), पिंकी ताई बालगुडे (माजी उपसरपंच विद्यमान सदस्य), रेश्माताई गणेश गायकवाड (विद्यमान उपसरपंच ताजे), गणेश केदारी (विद्यमान ग्रामपंचायत सदस्य पाथरगाव), सचिन केदारी (मा. उपसरपंच), मच्छिंद्र केदारी (मा.चेअरमन ताजे) असे सर्व मान्यवर व माय रमाई फाउंडेशन ट्रस्टचे सर्व पदाधीकारी, सदस्य उपस्थित राहणार आहेत.



