महाराष्ट्रसामाजिक

देहुरोड येथील आयुध निर्माण कारखान्याच्या परिसरातील २००० यार्ड्स परिसर प्रतिबंधित क्षेत्र (रेडझोन) उठविण्या बाबत.- आ. सौ. उमा ताई खापरे

दिनांक २४ मार्च २०२३ रोजी विधानपरिषद सभागृहात वरील विषयावर अर्धातास चर्चा झाली त्यात देहुरोड येथील आयुध निर्माण कारखान्याच्या परिसरातील २००० यार्डस क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून १३/१२/२०२२ रोजीच्या संरक्षण अधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे तडवळे, किवळे, रावेत, चिखली, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील नागरी वस्त्या बाधित होत असून ही गावे स्वतंत्र पूर्व काळापासून अस्तित्वात आहेत. नागरी वस्त्या मोठ्या प्रमाणात विकसित होत असून माहिती तंत्रज्ञान क्षेत्र एमआयडीसी, एसईझेड, विविध प्रकल्पासाठी जमिनीचा वापर होत असल्याने ७/१२ उताऱ्यावर रेडझोनचे शिक्के मारले आहेत. आ. सौ. उमा ताई खापरे यांनी वरील विषय विधान परिषद सभागृहात उपस्थित करून चर्चा घडवून आणली.

त्यामुळे लाखो शेतकरी बाधित झाले आहेत. तसेच लहान मोठे उद्योगांना अडचणी येत आहे. मा.ना.श्री. चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री पुणे तसेच मा. ना. श्री. उदय सामंत, उद्योगमंत्री यांनी सभागृहात आश्वासित केले की, मा. केंद्रीय संरक्षण मंत्री, भारत सरकार यांच्या समवेत तातडीने बैठक लावून त्या बैठकीस संरक्षण विभागाचे अधिकारी, महसुल विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांचा समावेश करून बैठक घेण्यात यावी. जेणे करुन तडवळे, रावेत, किवळे, चिखली, पिंपरी-चिंचवड येथील रहिवाशांच्या समस्या निराकारण होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!