आढळराव पाटील यांच्या कोलवडी येथील दौऱ्यातनागरिकांचा उत्साह..

हवेली : महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ हवेली तालुक्यातील कोलवडी येथे गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून गावभेटीस सुरवात करण्यात आली. दरम्यान, उमेदवार आढळराव पाटील यांचे मोठ्या उत्साहात जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी महायुतीचे शिरुर लोकसभेचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील,सरपंच विनायक गायकवाड, बाजर समिती संचालक शशिकांत गायकवाड, उपसरपंच रमेश मदने, देविदास नाना गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अमर गायकवाड, माजी सरपंच सतीश गायकवाड, अमोल गायकवाड, पंकज गायकवाड, आप्पासाहेब गायकवाड, आबासाहेब गायकवाड, काका गायकवाड, स्वप्नील उंद्रे आदी महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी बोलताना उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, “कोलवडी गावाने मला भरभरुन दिले आहे. मी अजित दादांच्या माध्यमातून खासदार नसतानाही एका गावासाठी दीड कोटींचा निधी मिळवून दिला. कुठलेही पद नसताना देखील मी एवढा निधी उपलब्ध करुन देत असेल तर मी परत या मतदार संघाचा खासदार झालो तर किती निधी मतदार संघात येईल हे तुम्हीच मला सांगा. तुम्ही मागील काळात निवडून दिलेला खासदार गावात फिरकलाही नाही. मी कुठल्याही गावात गेलो तर तेथील ग्रामस्थ मला सांगतात की, हे विद्यमान खासदार एकदाही गावात आले नाहीत. अशा खासदाराचा आपल्याला काय उपयोग?. आपल्या भागातील विकासाचा रथ आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल तर आदरणीय मोदीजी यांच्या विचाराचा खासदार निवडून द्या. येणाऱ्या 13 तारखेला आपण घड्याळासमोरचे बटन दाबून मला जास्तीत-जास्त मतदान करावे हीच विनंती करतो.
दरम्यान, संरपंच विनायक गायकवाड म्हणाले की,विद्यामान खासदार गावात एकदाही आले नाहीत, शिवाजी दादांनी मात्र गावासाठी 1 कोटी 40 लाखांचा निधी दिला. यावेळी घड्याळाला जास्तीत-जास्त मतदान करुन दादांना भरघोस मतांनी विजयी करावे.
स्वप्नील उंद्रे म्हणाले की, सध्या खासदार असलेले संपूर्ण शिरुर मतदार संघात गेली पाच वर्षे दिसलेच नाहीत. त्यांनी कुठलीही विकासकामे केली नाहीत. शिवाजी दादा यांना गावातून आम्ही मोठे मताधिक्य देऊ.



