महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाजाच्या बैठकीत कार्यकारिणी बरखास्त करण्याचा ठराव मंजूर..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑगस्ट २०२५ “सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज”, सामाजिक संघटना (महाराष्ट्र राज्य) या नोंदणीकृत संस्थेची तिसरी बैठक दिनांक १४ ऑगस्ट २०२५ रोजी, गुरुवारी दुपारी १ वाजता गुलाब पुष्प उद्यान, गवळीनगर, नेहरुनगर, टेल्को भोसरी रोड, पुणे येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. भिमरत्न बी.बी. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
बैठकीत संघटनेच्या कार्यकारिणीच्या कार्यकाळासंदर्भात आणि तिच्या कार्यक्षमतेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असून तो संपुष्टात आलेला आहे, मात्र आजपर्यंत कार्यकारिणीची कोणतीही पुनर्रचना करण्यात आलेली नाही. याशिवाय, अनेक पदाधिकारी व सदस्य बैठकीस अनुपस्थित राहत असून, संस्थेच्या निधीमध्ये (मासिक व वार्षिक वर्गणी) त्यांचा सहभागही अत्यल्प आहे.
या पार्श्वभूमीवर खालीलप्रमाणे एकमताने ठराव मंजूर करण्यात आला:
१) ज्येष्ठ नागरिक विभाग वगळता सर्व कार्यकारिण्या तत्काळ बरखास्त करण्यात याव्यात.
२) संस्थेचे सर्व हक्क व जबाबदाऱ्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी.बी. शिंदे यांच्याकडे देण्यात याव्यात.
३) पुढील कार्यकारिणी स्थापन होईपर्यंत ते संस्थेचे नामधारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील.
४) नवीन कार्यकारिणीच्या निवडीची पूर्ण प्रक्रिया देखील प्रा. शिंदे यांच्या देखरेखीखाली पार पडेल.
या निर्णयामुळे संघटनेच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, जबाबदारी आणि कार्यकुशलता आणण्याचा प्रयत्न होणार असल्याचे सांगण्यात आले.
बैठकीस प्रा. बी.बी. शिंदे, रामभाऊ ओव्हाळ, तुकाराम गव्हाणे, सौ. शालनताई ओव्हाळ, गोविंद गाडे, समीर मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!