महाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक
ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब मधे गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप..

प्रतिनिधी कळंब दि. ०२ जूलै २०२४ ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय व जुनिअर कॉलेज कळंब, आयोजित विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप प्रसंगी उपस्थित असणारे संस्थेचे चेअरमन आदरणीय रामचंद्र कदम साहेब यांच्या हस्ते गणवेशाचा वाटप करण्यात आले. उपस्थित विद्यालयाचे प्राचार्य सर्व गोड सर, पर्यवेक्षक आळंद सर, युवा संचालक प्रतापसिंह कदम सर, जुनिअर विभाग प्रमुख सावंत सर, जेष्ठ शिक्षक अर्जुन सर, राऊत सर, देवकर सर, माने सर, धनवडे सर, काशीद सर, पावरा सर, उपस्थित होते,
वालचंद विद्यालय हे ग्रामीण भागातील एक विद्यालय असून येथे गोरगरिबांची शेकडो मुलं दरवर्षी शिक्षण घेत असतात, या मुलांतूनच आज देश सेवा करण्यासाठी कित्येक तरुण युवक या विद्यालयाने घडवलेले आहेत.




