गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

उद्योजकाला रस्त्यात आडवुन अपहरण करून खंडणी, दरोड्यातील सराईतांना चाकण पोलीसांनी केले अटक..

प्रतिनिधी चाकण दि.०२ आक्टोंबर २०२३ चाकण दि. २१/०९/२०२३ रोजी रात्री ०९/१५ वा. चे सुमारास फिर्यादी संजय धुलाप्पा कुरूंदवाडे वय ५५ वर्षे, धंदा. उदयोजक रा. एकता नगर चाकण ता. खेड जि. पुणे हे आळंदी फाटा येथील त्यांचे वर्कशॉप मधुन एकता नगर येथील त्यांचे घराकडे जात असतांना सहा अनोळखी इसमांनी मिळुन त्यांची मोटार सायकल रिक्षा आडवी लावुन रस्त्यात आडवली व तु आमचे रिक्षास धडक मारली असा बहाणा करत सदर इसमांनी त्यांना त्यांचे रिक्षात जबरदस्तीने बसवुन गॅरेजला जावु तेथे खर्च दे असे म्हणत लादवड परीसरातील पाईट शिरोली रस्त्याशेजारी निर्जन ठिकाणी नेवुन फिर्यादी तुझा व्यवसाय खुप मोठा आहे.

तु आम्हाला एक कोटी रूपये दयावे लागतील तरच तुला सोडु नाहीतर तुला व तुझे घरच्यांचा गेम करून टाकीन अशी धमकी देत घुडघ्यावर हत्यार ठेवले. त्यावेळी फिर्यादी संजय कुरूंदवाडे यांनी त्यांना दोन दिवसांमध्ये १२ लाख रूपये देण्याचे मान्य केले. त्यावेळी सदर अनोळखी चोरटयांनी फिर्यादीचे सॅग मधील २० हजार रूपये जबरीने काढुन घेतले. व दोन दिवसांमध्ये पैसे दिले नाहीत अगर पोलीसांना त्याबाबत काही सांगीतले तर तुला व तुझे घरातील लोकांना सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यावेळी सदर अनोळखी लोकांनी संजय धुलाप्पा कुरूंदवाडे यांना सोडले. त्यानंतर दि. २२/ ०९/ २०२३ रोजी सायंकाळी ०५/००वा. चे सुमारास सदर अनोळखी लोकांनी फिर्यादी यांना फोन करून शनिवारी ०५ लाख रूपये दे व रविवारी ०७ लाख रूपये दे असे म्हणुन पैशाचे नियोजन झाले का नाही या बाबत फोन करून विचारले असता फिर्यादी यांनी घाबरून त्यांना पैशाची व्यवस्था करीत असल्याचे सांगीतले.
दि. २३/०९/२०२३ रोजी सायंकाळी ०५/०० वा. चे दरम्यान सदर अनोळखी इसमांनी वेगवेगळ्या फोनवरून संजय कुरूंदवाडे यांना फोन करून धमक्या देत खंडणीचे पैशाची मागणी केली असता संजय कुरूंदवाडे यांनी त्यांचे मित्र व नातेवाईक यांना सदर प्रकार सांगीतला असता मित्रांनी संजय कुरूंदवाडे यांना धिर दिला. त्यानंतर संजय कुरूंदवाडे हे मित्रांसोबत चाकण पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले त्यादरम्यान सदर अनोळखी इसम संजय कुरूंदवाडे यांचे फोनवर वेगवेगळया फोन वरून फोन करून खंडणीसाठी तगादा लावुन नाणेकरवाडी येथील आरोग्यम हॉस्पीटल जवळील जंबुकर वस्तीकडे जाणारे रोडने बोलावले होते. त्यावेळी चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी संजय कुरूंदवाडे यांचे सोबत नाणेकरवाडी येथे जावुन अनोळखी इसमांनी पैसे घेवुन बोलावलेल्या ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी सदर अनोळखी आरोपींनी संजय कुरूंदवाडे यांना नाणेकरवाडी येथील आरोग्यम हॉस्पीटल जवळ असलेल्या हिताची एटी.एम.चे बाजुचे कच-याचे डब्यात पैसे टाकुन निघुन जाण्यासाठी सांगीतले.
त्याप्रमाणे संजय कुरूंदवाडे यांनी त्यांचेकडील सॅग एटी.एम.चे बाजुचे कच-याचे डब्यात टाकली व तेथुन ते निघुन गेले असता एक इसम पैसे घेण्यासाठी आला त्यावेळी सापळा लावलेल्या डी. बी. पथकाने त्यास शिताफीने ताब्यात घेतले. त्यावेळी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव आकाश विनायक भुरे, वय २४ वर्षे रा. नाणेकरवाडी
ता. खेड जि. पुणे असे सांगीतले, त्यास त्याचे सहकारी यांचेबध्दल विचारले असता त्याने त्याचे सहकारी शुभम युवराज सरवदे, अजय येलोटे, सोहेल पठाण, पन्या गोसावी असे असल्याचे सांगीतले. त्यानंतर संजय कुरूंदवाडे यांचे तक्रारीवरून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं ७५५ / २०२३ भादवि कलम ३९५, ३८७, ३६४ अ प्रमाणे दाखल केला.
सदर गुन्हयाचे गांभिर्य लक्षात घेवुन मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ – ३ श्री. संदिप डोईफोडे, मा. सहा. पोलीस आयुक्त, राजेंद्र गौर यांनी तात्काळ घटना स्थळावर येवुन घटने बाबत माहिती घेवुन तपास पथकाला गुन्हयाचे तपासात सुचना व मार्गदर्शन केले. त्यांनर सदर गुन्हयाचे तपासात सदरचा गुन्हा हा १) शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे रा. अहमदनगर कॉलणी नाणेकरवाडी ता. खेड जि. पुणे याने आरोपी नामे २) आकाश विनायक भुरे, वय २४ रा. नाणेकरवाडी ता. खेड जि. पुणे, ३) शुभम युवराज सरवदे, वय २१ वर्षे, रा. नाणेकरवाडी ता. खेड जि. पुणे, ४) अजय नंदु होले, वय २८ वर्षे, रा. हडपसर गाडीतळ पुणे, ५) नवनाथ शांताराम बच्छे, वय २७ वर्षे, शिकापुर रोड, कडाचीवाडी ता. खेड जि. पुणे व आणखी दोन आरोपी यांचेशी संगनमत करून नियोजनबध्द कट रचुन सदरचा गुन्हा केलेला असल्याचे तपसात निष्पन्न झाले. सदर गुन्हा केल्यानंतर वरील आरोपी हे फरार झाले होते, त्यानंतर चाकण पोलीस स्टेशन कडील डी. बी. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सलग तीन दिवस अथक परीश्रम घेवुन च-होली, शिकापुर, हडपसर, कात्रज, पुणे येथुन आरोपींचा शोध घेत ताब्यात घेतले तसेच सदर गुन्हयात एकुण ०५ आरोपींना अटक करण्यात आलेली असुन उर्वरीत ०२ आरोपींचा शोध सूरू आहे. यातील अटक आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर यापुर्वी चोरी खुन, मारामारी, चोरी, अवैध शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.क्र. आरोपीचे नाव पुर्व ईतिहास / दाखल गुन्हे
१) आकाश विनायक भुरे- १) चाकण पो. स्टे. २७३/२०२२ महा. दारूबंदी कायदा कलम ६५ (ई)
२) शुभम युवराज सरोदे-१) चाकण पो. स्टे ५७० / २०२१ भादवि कलम ४५२, ४२७, ३२४, ५०४, ५०६, ३४. २) राजगड पो. स्टे. ७१/२०२३ भादवि कलम ३८०, ५११, ४२७,
३) अजय नंदू होले-१) हडपसर पो. स्टे. ७७/ २०१८ भादवि कलम ३५४ ड, पोस्को कलम ८, १२. २) हडपसर पो. स्टे. १५०/२०२१ आर्म ॲक्ट कलम ३ (२५),
४) नवनाथ शांताराम बच्चे-१) चाकण पो. स्टे. १२८१/२०१७ भादवि कलम ३०२, ३९७, ४०४, ३४
५) शुभम उर्फ सोन्या विनोद काकडे-१) भोसरी पो. स्टे. ३२६ / २०२० आर्म ॲक्ट कलम ३ (२५). २) चाकण पो. स्टे. २४/२०२० आर्म ॲक्ट कलम ३५. (२५)

सदर गुन्हयातील अटक आरोपी क ०१ ते ०५ यांची दिनांक ०१/१०/२०२३ रोजी पर्यंत पोलीस कोठडी मंजुर झाली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त श्री. सजंय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री. वसंत परदेशी, पोलीस उप. आयुक्त परिमंडळ-३ श्री. संदिप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त राजेंद्र
गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक कदम, पोलीस निरीक्षक गुन्हे श्री. युनुस मुलाणी तसेच तपास पथकाचे स.पो.नि. प्रसंन्न ज-हाड, स.पो.नि. विक्रम गायकवाड, स.फौ./ सुरेश हिंगे, पो.हवा. / राजु जाधव, पो. हवा. /
संदिप सोनवणे, पो. हवा./ हनुमंत कांबळे, पो. हवा. भैरोबा यादव, पो.ना. / निखील शेटे, पो.कॉ. / नितीन गुंजाळ, पो.कॉ. /
निखील वर्पे, पो.कॉ. /प्रदिप राळे, पो.कॉ. / सुनिल भागवत, पो.कॉ. / ईश्वर गंगावणे, पो.कॉ. / अशोक दिवटे, पो.कॉ. / महेश कोळी,
पो.कॉ. / विवेक सानप, म.पो.कॉ. / माधुरी कचाटे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि. विक्रम गायकवाड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!