
प्रतिनिध- रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्ताने स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या H.A येथील पुतळ्याला व कामगारांचे नेते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील पुतळ्याला रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे, पोलीस उपनिरीक्षक गुळीग साहेब, निलेश पवार, तृतीयपंथी सुरक्षा रक्षक सिद्धी कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचा कामगार दिनानिमित्त त्यांना गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला व मिठाई वाटप करून आनंद साजरा केला..
यावेळी रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे सर यांनी असे मत व्यक्त केले की पिंपरी चिंचवड शहर आज स्वच्छ व सुंदर शहर म्हणून ओळखले जाते ते केवळ या सफाई कर्मचाऱ्यांमुळे.सफाई कर्मचारी यांच्यामुळे अनेक वेळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला व शहराला स्वच्छतेच्या बाबतीत पुरस्कार मिळाले आहे.याकरिता आपण सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे..
यावेळी प्रमुख उपस्थिती पोलीस उपनिरीक्षक गुळीव साहेब ,आरोग्य निरीक्षक चटोले रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे,प्रदेश महासचिव संतोष शिंदे, सदस्य निलेश आठवले, संघटक अजय चक्रनारायण, सहसचिव सचिन सूर्यवंशी तसेच रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष/खजिनदार निलेश पवार, सचिव सिद्धी कुंभार, उपाध्यक्ष रितिका परमार, सहसचिव आरोही राठोड, सदस्य रोहिणी मोरे तसेच सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते..




