वंचित बहूजन युवा आघाडी मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर हल्ला प्रकरणात आरोपींना अटक व्हावी.. चंद्रकांत लोंढे
प्रतिनीधी- पिंपरी चिंचवड वंचित बहूजन युवा आघाडी मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर हल्ला प्रकरणात आरोपींना अटक व्हावी. हल्ल्याचा मास्टर माईंडला गजाआड न केल्यास वंचित बहूजन युवा आघाडीच्या जनआंदोलन बाबत निवेदन पिंपरी पोलिसस्टेशनला देण्यात आले.
या वेळी वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)चे शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी सांगीतले की २७ मे रोजी वंचित बहुजन युवक आघाडीचे मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर आणि वार्ड अध्यक्ष गौतम हराळ ह्यांचेवर आंबेडकर भवन परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला असून युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) ह्याचे वतीने निवेदन देण्यात येत आहे.
२७ मे रोजी आंबेडकर भवन दादर येथे वंचित बहुजन आघाडी मुंबई प्रदेश च्या कार्यकर्त्यांची बैठक होती. मुंबईत सध्या वंचित बहुजन आघाडीच्या जोरदार सभा होत आहेत. पुढील सभा ही ३ जून रोजी होणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी कार्यकर्ते जमले होते. सायंकाळी ठिक ६.३० ते ७ च्या दरम्यान वंचितचे मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष श्री. परमेश्वर रणशुर आणि वॉर्ड अध्यक्ष गौतम हराळ यांच्यावर आंबेडकर भवन परिसरात चार अज्ञात इसमांनी लोखंडी रॉड, आणि तलवार, चाॅपरने जीवघेणा हल्ला केला आहे. वंचित बहूजन युवा आघाडीच्या वतीने या घटनेचा जाहिर निषेध करण्यात येत असून राज्यभर युवा आघाडी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देत आहे. जीवघेणा हल्ला प्रकरणात आरोपी आणि सूत्रधार जगदीश गायकवाड टोळीला अटक करण्याची मागणी करीत आहोत. परवा जगदीश गायकवाड यांच्या मुलाचा वाढदिवस होता त्याच दिवशी हा हल्ला करण्यात आला आहे. CWC या युट्युब चॅनेलचा संचालक सुनील नागवंशी ह्याने काल हल्ला नंतर आनंद व्यक्त करणारे स्टेस्ट टाकले होते.
हा हल्ला परमेश्वर रणशूर वर नसून हा आंबेडकर भवन वरील हल्ला आहे. पक्ष नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द बोलून आंबेडकर घराण्या संबंधी अपशब्द बोलणाऱ्या जगदीश गायकवाड आणि टोळी या हल्यात सहभागी असल्याचा आरोप युवा आघाडीचा आहे. हल्ला वेळी आंबेडकर भवन परिसरात असलेले सी.सी.टीव्ही. तपासून तसेच त्यावेळी परिसरात ऍक्टिव्ह मोबाईल नंबर देखील तपासण्यात यावे.
या बाबतीत युवा आघाडीच्या सर्व जिल्हा तालुका आणि शहर कमिटीच्या वतीने तातडीने आपल्या भागातील पोलीस स्टेशनमध्ये गृह मंत्री महाराष्ट्र यांना निवेदने देण्यात येत आहेत. त्याद्वारे आम्ही अशी मागणी करतो की, या हल्ल्यात जखमी झालेल्या मुंबई अध्यक्ष परमेश्वर रणशूर ह्यांना सुरक्षा पुरविण्यात यावी. तसेच हल्ला प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक व्हावी, हल्ल्याचा मास्टर माईंड असलेल्या जगदीश गायकवाड आणि टोळीला अटक करण्यात यावी, त्यांचेवर कलम ३०७ सह संघटित गुन्हेगारीचे कलम (मकोका) लावून त्याचे अवैध संपत्ती बाबत महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीने दिलेल्या तक्रारी नुसार सी.बी.आय. आणि ई.डी. कडून चौकशी होऊन त्याची अवैध संपत्ती जप्त करण्यात यावी.अश्या मागण्या करण्यात येत आहेत.
गृहमंत्री ह्यांनी दोन दिवसांत आरोपी अटक करून कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत तातडीने कार्यवाही न झाल्यास राज्यभर युवा आघाडी आंदोलन करेल असा इशारा देखील युवा आघाडीच्या वतीने देण्यात आला आहे. असे वंचित बहुजन युवा आघाडी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा)चे शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी या वेळी सांगीतले.