महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

सहाय्यक आयुक्त “श्रीमती संगीता डावखर” मॅडम यांची जाणिवपूर्वक केलेली बदली थांबवण्यात यावी.. प्रा.बी. बी. शिंदे

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता डावखर मॅडम यांची जाणिवपूर्वक केलेली बदली थांबवण्यात येवून आहे त्याच ठिकाणी त्यांना सेवा करण्याची संधी दयावी या करीता मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहब व मा. सचिव डॉ. सुमंत भांगे साहेब
सामाजीक न्याय व विशेष साहाय्य विभाग, यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.
वरील विषयांकीत बातमी दिनांक 30/04/2023 सोमवार रोजी दै. लोकमत पेपर मधे वाचली तेव्हां
आम्हाला अक्षरश: धक्काच बसला आणि डोळे ही पाणावले या मागील कारण ही तसेच आहे. “संगीता डावखर मॅडम” इतक्या समजदार होत्या की त्या नेहमी गोर, गरीब मागासवर्गीय
समाजाच्या हितासाठी निस्वार्थ पणे काम
करणाऱ्या समाज हित दक्ष, अशा स्वभावाच्या होत्या. अशा कर्तूत्वनिष्ठ व्यक्तीची बदली होतेच कशी या बाबत, आम्हालाच नव्हे तर सदर कार्यक्षेत्रातील सर्व मागासवर्गीय समाज बांधवात
चर्चा होत आहे.
हेतुपुरस्सरविषयक खोटे कागदपत्र आपणाकडे वरील विषयांकीत प्रश्नाबाबत कोणीतरी दिले असतील. असे आम्हास वाटते. ते गृहित न धरता श्रीमती संगीता डावखर मॅडम यांची बदली त्वरीत थांबवण्यात येवून त्यांना त्याच जागेवर सेवा करण्याची संधी द्यावी. अशा विनंतीचे पत्र मूख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब व मा. सचिव डॉ. सुमंत भांगे साहेब यांना पाठवल्याचे सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज
सामाजीक संघटना (महा.राज्य)चे संस्थापक अध्यक्ष प्रा.बी. बी. शिंदे यांनी सांगीतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!