
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड (शिरूर लोकसभा) दि. ०२ मे २०२४ “दूखी मन मेरे सून मेरा कहना जहां नही चैना वहां नही रहना..” या गीता प्रमाणे राष्ट्रवादीत सध्या सूर आळवला जात आहे.
मिळालेल्या माहिती नूसार मानसन्मान मिळत नसल्याने बरेच दिवस काही मोठे पदाधीकार्यांनी शिरूर लोकसभा उमेदवार डाॅ. अमोल कोल्हेंच्या प्रचाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. आम्ही या पदाधीकार्यांना भेटून विचारले असता ते काही सांगायला तयार नाही पण बोलण्याच्या प्रकारावरून तर असेच जानवते आहे की “चहा पेक्षा किटली गरम” असेच काही यांना बोलायचे आहे असे भासले.
या मूळे बातम्यांचा ओघ ही कमी झाल्याचे दिसते आहे.
या उलट शिवसेना उद्धव ठाकरेंचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारात हेच पदाधीकारी स्वयंम स्फूर्तीने काम करताना दिसतात.
यावरू असे जाणवते आहे की वाघेरे पाटलांची टीम सर्वांना सन्मानाची वागणूक देत आहे. जी खरेतर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवाराकडून पक्षाच्या पदाधीकार्यांना अपेक्षित होती.
याचमूळे कदाचित डाॅ. अमोल कोल्हेंची खासदारकीची वाट थोडी अवघडच होणार असल्याचे दिसते आहे.



