कलाक्रीडाशहर

भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी संगीत अकादमी, आयोजित “संगीत अकादमी नामकरण सोहळा” व “वासंतिक संगीत शिबीर २०२३”

प्रतिनिधी दि.१८/०४/२०२३ पिंपरी चिंचवड महानगरपालिका, क्रीडा विभाग, भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी संगीत अकादमी आयोजित “वासंतिक संगीत शिबीर २०२३” चे आज दि.१९/०४/२०२३ रोजी गायक, संगीतकार, दिग्दर्शक डॉ.सलील कुलकर्णी यांनी स्वर, लय, शब्द, भाव या सगळ्यांचा उपयोग गाण्यात कसा करावा. हे सर्व प्रात्यक्षिकांसह समजाऊन सांगितले. नवरसातील गीते गाऊन फरक दाखवून दिला. ताल तयार होण्यासाठी कसा रियाज करावा यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच माईक टेक्नीक, श्वास, उच्चार या विषयी मार्गदर्शन केले व आलेल्या सर्व शिबिरार्थीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व खालीलप्रमाणे दोन गाणी बसवून घेतली.
१) ऐसे काही व्हावे
मन शांत निजावे…
२) चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे मातीतल्या कणसाला मोतीयाचे दाणे….
सदर दिवशीच्या शिबीराचे सुत्रसंचालन श्री.समीर सुर्यवंशी यांनी केले. वरील कार्यक्रमास मा.उपायुक्त श्री.मनोज लोनकर, क्रीडा अधिकारी श्रीमती. अनिता केदारी, क्रीडा पर्यवेक्षक श्री. अरुण कडुस तसेच संगीत शिक्षक श्री.समिर सुर्यवंशी, श्री.नंदीन सरीन, श्री.उमेश पुरोहित, श्री. मिलिंद दलाल, श्री.संतोष साळवे, श्री.विनोद सुतार, श्रीमती.वैजयंती भालेराव, श्री.स्मिता देशमुख उपस्थित होते. तसचे “वासंतिक संगीत शिबीर २०२३” चे उदया चौथ्या दिवशी डॉ. अलका देव मारुलकर, विख्यात शास्त्रीय गायक तज्ञ मागदर्शक यांचे मार्गदर्शन होणार आहे. प्रशासन अधिकारी क्रीडा विभाग यांनी माहिती दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!