गून्हादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहर

दिल्ली येथील चोरीच्या चारचाकी गाडयांची महाराष्ट्रात बनावट कागदपत्रांव्दारे विक्री करणारी टोळी दरोडा विरोधी पथकाकडुन जेरबंद..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १३ जानेवारी २०२४, १,५७,००,०००/- रु किंमतीच्या ११ चार चाकी गाडया हस्तगत. पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे हददीतील वाहन चोरीच्या अनुषंगाने मा.वरीष्ठांचे आदेशाने पिंपरी-चिंचवड
पोलीस आयुक्तालयाचे दरोडा विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार हे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढत असताना स.पो. फौ. महेश खांडे व पोलीस हवा नितीन लोखंडे यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून दिनांक ०५/०१/२०२४ रोजी हिंजवडी परिसरातून चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०५९/२०२१ भा.द.वि. कलम ३७९ मधील चोरीस गेलेल्या इको गाडीसह सातारा जिल्हयातील पोलीस रेकॉर्डवरील वाहनचोर नामे अजीम पठाण यास त्याचा साथीदार नामे शशीकांत काकडे यावेसह आणखी एका चोरीव्या ब्रेझा गाडीसह ताब्यात घेण्यात आले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे केलेल्या तपासात सदर आरोपींकडे मिळून आलेल्या गाडया व्यतिरिक्त त्यांनी अनेक चोरीच्या गाड्यांचे व्यवहार केल्याचे निष्पन्न होत असल्याने आम्ही मा. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त सो, पिंपरी चिंचवड यांना कळविल्यावर त्यांनी सदर गुन्हा दरोडा विरोधी पथकाकडे वर्ग करून सखोल तपास करण्याचे आदेश दिल्ल्याने चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. १०५९/ २०२१ भा.द.वि. कलम ३७९ या गुन्हयाचा तपास दरोडा विरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला.
दाखल गुन्हयाचे सखोल तपासादरम्यान आरोपी नामे १. अजीम सलीम पठाण वय ३४ वर्षे, मु.पो रहीमतपुर मेन रोड, बाजारपेठ महाराष्ट्र बॅके शेजारी, ता कोरेगाव, जि. सातारा २. शशिकांत प्रताष काकडे वय ३० वर्षे, रा. मु.पो साखरवाडी (पिंपळवाडी), ता फलटण जि. सातारा यादोघांनी मिळुन आपल्या आंतरराज्य गुन्हेगारी टोळीच्या मदतीने परराज्यातुन चोरुन आणलेल्या पुढील प्रमाणे चार चाकी गाडया जप्त करण्यात आल्या आहेत.

अशा एकुण ०१ कोटी ५७ लाख रु च्या ११ चार चाकी गाडया आरोपीकडुन जप्त करण्यात आलेल्या आहेत व आणखी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. वरील दोन आरोपी सोबत ३. राजाराम उर्फ राजु तुकाराम खेडेकर वय ३४ वर्षे रा. पटवर्धन कुरोली, ता. पंढरपुर, जि. सोलापुर ४ महेश भिमाशंकर सासवे वय ३१ वर्षे, रा १६९ राघवेद्रनगर, विजापुर रोड, सोलापुर याना
अटक करुन ५. प्रशांत माने रा रहीमतपुर ६ विकास माने रहीमतपुर ७. भरत खोडकर रा सांगली ८. हाफिज रा. मेरठ उत्तर प्रदेश ९. इलियास रा बेंगलोर १० रसुल शेख रा. इचलकरंजी अशी आंतरराज्यीय वाहन चोरांची टोळी निष्पन्न करण्यात आलेली आहे. तसेच यातील भरत खोडकर हा सांगली जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे.
आरोपी नामे महेश सासवे यास ताब्यात घेतेवेळी त्याचे अंगझडती मध्ये ५००/- रू दराच्या ०२ बनावट चलनी नोटा मिळून आल्या असून त्याबाबत आरोपीवर बनावट नोटा बाळगल्या प्रकरणी नवीन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. आरोपी नामे अजिम पठाण यास सन २०२३ मध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा जिल्हा यांनी अटक करून त्याचेकडून अशाच प्रकारे ०९ चार चाकी गाडया जप्त करण्यात आल्या होत्या. आरोपी अजीम पठाण हा दिल्ली येथे विमानाने प्रवास करीत जात असे व तेथे आपल्या सहकाऱ्यांचे मदतीने वाहन चोरी करुन महाराष्ट्रात कमी किमतीत वाहने विक्री करीत असे त्यासाठी खरेदी करणाऱ्यांना बनावट कागदपत्रे देत होता.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे सो. पिंपरी चिंचवड, मा. डॉ. संजय शिंदे सो सह पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, मा. स्वप्ना गोरे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, मा. श्री बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे १, सहा पोलीस आयुक्त मा. श्री. सतीश माने, गुन्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस उप-निरीक्षक भरत गोसावी, पोलीस अंमलदार महेश खांडे, औंदुबर रोंगे, उमेश पुलगम, विक्रांत गायकवाड, राहूल खारगे, नितीन लोखंडे, गणेश हिंगे, आशिष बनकर, प्रवीण माने, सागर शेडगे, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, अमर कदम, गणेश सावंत, सुमित देवकर, विनोद वीर, समीर रासकर, चिंतामण सुपे, पो हवा माळी, व पोशि हुलगे तांत्रिक विश्लेषण विभाग यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!