
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ डिसेंबर २०२३ खाजगी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणे सर्वसामान्यांना शक्य नाही लाखो रुपये फी व डोनेशनच्या नावाखाली सर्वसामान्यांकडून लाखो रुपये उकळले जात आहेत. खाजगी शिक्षण संस्थांचा सुळसुळाट झाला आहे. त्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही शिक्षणाचा मूलभूत अधिकारा अंतर्गत सन २००९ पासून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २५% मोफत शिक्षणासाठी आरक्षण शासनाने जाहीर केलेले आहे. त्यामुळे प्रत्येक खाजगी शाळेमध्ये इयत्ता १ ली ते ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत ज्या विद्यार्थ्यांचे पालक आर्थिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्याच मुलांना इयत्ता १ ली ते ८ वीपर्यंत प्रवेश दिला जातो परंतु जे पालक आर्थिक दृष्ट्या दुर्बल मागास आहेत त्यांची मुले इयत्ता ९ वी नंतर पुढे शिक्षण घेत नाहीत कारण इयत्ता ९ वी नंतर प्रत्येक खाजगी शाळेची वार्षिक फी ही पालकास न परवडणारी साधारणता लाखो रुपयांच्या वरती असते त्यामुळे अशा शाळांमध्ये आपल्या पाल्यांना शिकवणे त्यांना शक्य होत नाही व ही मुले नंतर शिक्षणापासून वंचित राहतात शासनाच्या अनेक योजना आहेत परंतु त्याचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्यांना कधीच मिळत नाही शासनाने शिक्षणासाठी जास्तीत जास्त आर्थिक तरतूद करणे गरजेचे आहे आणि ते त्यांनी लवकरात लवकर करावे इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना R T E च्या कक्षेमध्ये आणून त्यांना शिक्षणाचा लाभ द्यावा या मागणी करिता आज सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजले पासून ते दुपारी ०२ वाजेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहर सचिव राजेंद्र साळवे व पालक संघाचे लखन रावळ यांनी केले. या वेळी वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष ॲड. सर्वजीत बनसोडे, प्रदेश सचिव अनिताताई सावळे, शहर महासचिव संजीवन कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सदर अंदोलनामध्ये वंचित बहुजन महिला आघाडी पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शारदाताई बनसोडे, युवा अध्यक्ष ( पश्चिम पिंपरी चिंचवड शहर) नितीन गवळी, उपाध्यक्ष धनंजय कांबळे, विकी तामजीकर, सचिव विजय ओहोळ, बाबासाहेब शिवशरण, जितेंद्र मोठे ,भीमराव गायकवाड, शिवाजी खडसे, उपाध्यक्ष मंदाकिनीताई गायकवाड, महासचिव रेखा वाघमारे, सचिव कुसुम गवळी, शोभा दाभाडे, श्यामा जाधव, सुषमा जावळे, मनीषा साळवे, सविता डोंगरे, अनिता सोनवणे, युवा महासचिव सुनील जावळे, प्रशांत मोहोळ, हरिभाऊ गाडे, सुभाष बोकेफोडे कल्याण गरड व अनेक पालक व कार्यकर्ते या उपस्थित होते.





