
प्रतिनिधी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात परवा ०५ आणि आज १७ रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं. असे जितेंद्र आव्हाड बोलले.
आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण हॉस्पिटलची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहे. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी.
ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच प्रशासन व हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी राष्ट्रवादी कांग्रेस मागणी करीत आहोत. असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून सांगीतले.



