अण्णा भाऊ साठे स्मारकाची मेट्रो कडून विटंबना. तात्काळ मेट्रो व संबंधित अधिकाऱ्यांवर पोलिस कारवाई करण्यात यावी- अरूण जोगदंड

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि २६ नोव्हेंबर २०२४ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक भक्ती शक्ति चौक निगडी येथील स्मारकाची रक्षा भिंत मेट्रो कडून तोडण्यात आली आहे.
मेट्रो अधिकार्यांना वेळो वेळी स्मारक समितीकडून सूचना देण्यात आल्या होत्या.. तरी ही आज रक्षा भिंत तोडण्यात आली आहे, रक्षा भितीवर जाणीवपूर्वक मेट्रोचे मटेरीयल टाकण्यात आल्याने ही भिंत तूटली आहे. मेट्रोच्या अधिकार्यांशी या संदर्भात विचारपूस केली असता, उडवा उडविची उत्तरे व तुम्ही नाटक करु नका नाहीतर तुम्हाला बघून घेऊ असा आधिकारी दम देत आहेत.
तसेच मेट्रोचे पिलरचे खड्ड्याचे खोदकाम करताना खुप हेवी ब्रेकरचा वापर करण्यात आला आहे, त्यामुळे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास देखील तडे गेले आहे. मेट्रो आधिकर्यांकडुन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. ही बाब खुप धक्कादायक आहे.
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समिती मा. अध्यक्ष व युवासेना उपजिल्हाप्रमुख अरुण जोगदंड यांच्या कडून मेट्रो विरोधात पोलिस ठाण्यात निवेदन पत्र देण्यात आले आहे. व मेट्रो स्मारका लगत कोणतेही मेट्रोचे काम होऊ देणार नाही अशी स्पष्ट भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.
तरी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची मेट्रो कडून विटंबना करण्यात आली असून तात्काळ मेट्रो व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. अशी मागणी अरूण जोगदंड यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
दरम्यान ही गोष्ट मातंग समाजाच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने योग्यती कायदेशीर कारवाई न झाल्यास जर कायदा सुवेवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यासाठी पोलिस प्रशासन, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व मेट्रो हे पूर्णपणे जबाबदारी असतिल असा इशारा जोगदंड यांनी यावेळी दिला आहे.




