पिंपरी चिंचवडला रोहित पवारांचा दूसरा दौरा.. सर्व मिळून गणेश उत्सव करू साजरा..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड २३ सप्टेंबर २०२३ पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा शरद पवार गट ‘सक्रिय’ झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आज शहरातील गणेश मंडळांना भेटी देणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगीतले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावर तुषार कामठे या तरुण, हूशार व कार्य करण्याची क्षमता असलेल्या सक्षम खांद्यावर जयंत पाटील यांनी जबाबदारी दिली. त्यांच्या या निवडीनंतर शहराच्या राजकारणात एक नव चैतन्य निर्माण झाले आहे. आता शहर नक्की कुणाचे याची चक्रे जोरात फिरू लागली आहेत. नुकतेच आमदार रोहित पवार यांनी स्वता बूलेट चालवत कधी अध्यक्षांच्या बूलेटवर बसून बाईक रॅली केली त्याने यूवकांना अकर्षित केले. प्रत्येक समस्या समजून घेवून व उपाय योजनेची ग्वाही देवून संस्था मंडळे यांना सूखद धक्का देत पत्रकार परिषद घेऊन पिंपरी चिंचवडमध्ये लक्ष घालणार असल्याचा जनू सूचक इशाराच विरोधकांना दिला आहे. त्यातच आज (दि.२३) शनिवार हा दिवस रोहित पवार यांनी खास पिंपरी चिंचवडच्या गणेश मंडळाना भेटी देण्यासाठी काढला असल्याचे तुषार कामठे यांनी सांगीतले आहे. आज शनिवाद दिनांक २३ सप्टेंबर २०२३ला दुपारपासून ते तिन ही विधान सभा भागातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरीतील गणेश मंडळाना भेट देतील. यावेळी ते गणेश मंडळासोबतच काही आजी माजी नगरसेवक आणि जेष्ठ नेत्यांच्या आणि गृहनिर्माण संस्थाच्या भेटीगाठी देखिल घेणार आहेत.
त्याच सोबत विघ्नहर्त्याला पिंपरी चिंचवडकरांच्या समस्या सांगून त्या सोडवण्याची आम्हाला शक्ती-युक्ती आणि आशीर्वाद दे, अशी याचना करण्यासाठी आमदार रोहित पवार येणार असल्याचे अध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले आहे. शहराच्या राजकरणात रोहित पवार यांच्या सोबत नवोदित अध्यक्ष तुषार कामठे यांच्या एंट्रीने येणाऱ्या काळात पिंपरी चिंचवडचा चेहरा बदलला जाईल यात काही शंका नाही.