प्रतिनिधी कांचन बेंद्रे पूणे दि. २७ सप्टेंबर २०२३ ” विजय वाघचौरे प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ महिला भगिनींसाठी हा कार्यक्रम महालक्ष्मी नगर बिबेवाडी येथे आयोजित करण्यात आला होता, यात असंख्य महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
पहिल्यांदाच सोसायटीमध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवला होता त्यामूळे सर्व महिला वर्गाने अगदी मनापासून या खेळाचा मनमुराद आनंद लूटला सोसायटीतील पूरूषवर्ग ही मागे नव्हता महिलाना खेळतानां पाहून टाळ्या वाजवत प्रोत्साहन देत होते,
लहान मूले मूली ही याचा आनंद लूटताना दिसत होते. अनेक वर्षानंतर सर्व सोसायटीतील महिला भगिनी एकत्र येऊन छान आनंद झाला अशी भावना सर्वांनी व्यक्त केली.
या वेळी योगिता गोसावी , रूपाली पाथरे , सोनल खिवसरा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले , महालक्ष्मी नगरचे सागर मिसाळ, मिना देशपांडे , स्नेहलता जाधव यांचे विशेष आभार विजय वाघचौरे यांनी मानले.