पद्मविभूषण शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भागवत वारकरी संमेलनाचे रविवारी आळंदीत आयोजन.
प्रतिनिधी आळंदी देवाची दि. २७ सप्टेंबर २०२३ संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पावन भूमीत पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीत वारकरी संमेल होत आहे. या संमेलनात संत साहित्यावर परिसंवाद, चर्चा होणार असून मान्यवर कीर्तनकार यांचा सन्मान होणार आहे.
वारकरी संत साहित्य आजही ताजे टवटवीत असून समाजाला दिशा देणारे आहे. संत साहित्यातील योग्य विचार समाजात रुजल्यास समता, स्वातंत्र्य, बंधुत्व वृधिंगत होऊन सामाजिक ऐक्य भक्कम होईल, हा आशावाद मनाशी दृढ करून जे कीर्तनकार कार्य करीत आहेत त्यांचा सन्मान या संमेलनात होणार आहे.
भागवत वारकरी महासंघाच्या वतीने आयोजिलेल्या या संमेलनात पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून दिनकर शास्त्री भूकेले या सोहळ्याचे अध्यक्ष आहेत. विलास लांडे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ह.भ.प. विकास लवांडे करणार आहेत. या संमेलनात ‘संत विचार आणि भारतीय संविधान’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्याचे अध्यक्ष ह.भ.प. शामसुंदर महराज सोन्नर असणार आहेत. तर ह.भ.प. दिनकर भुकेले शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या परिसंवादाचा विषय आहे मनूस्मृती आणि भागवत वारकरी संप्रदाय. उद्धव महराज शिंदे यांच्या भजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून ह.भ.प. दु:शासन महाराज क्षीरसागर हे पंचपदी करणार आहेत. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन ह.भ.प. भारत महराज जाधव हे करणार आहेत. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भारत महराज घोगरे गुरुजी, देवराम महराज कोठारे, सतीश काळे, निरंजन महराज सोखी, सुरेश महराज भालेराव, राजू भुजबळ, समाधान महराज देशमुख, तुकाराम महाराज घाडगे, शंकर बहिराट, मुबारकभाई शेख हे सर्वजण संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या भागवत वारकरी संमेलनास पिंपरी चिंचवड शहर परिसरातील कीर्तनकार तसेच वारकऱ्यांसह सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संमेलनाचे आयोजक सतीश काळे यांनी यावेळी केले आहे.