दिघी पोलीसांची कारवाई.. तिन तासात केला जबरीचोराला लाॅकअपचा जावई..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २५ सप्टेंबर २०२३
निर्जनस्थळी चाकुचा धाक दाखवुन जबरी चोरी करणाऱ्या आरोपीस दिघी पोलीस ठाणे तपास पथका कडुन ३ तासाच्या आत अटक करुन मोटारसायकल जप्त करण्यात आली.
दिघी पोलीस ठाणे येथे तक्रारदार नामे अशोक पुनवासी जैसवाल वय ३० वर्षे व्यवसाय नोकरी रा. सावतामाळी मंदिरा जवळ चंद्रकांत निकम यांचे खोलीत चन्होली गाव पुणे यांनी तक्रार दिली की ता. २१/९/२०२३ रोजी रात्री ११:४५ वा.चे सुमारास शास्त्री चौक ते च-होली गाव येथे जुपीटर गाडीवरुन जात असताना गव्हाणे पेट्रोलपंप जवळ अनोळखी इसमाने त्यांच्याकडे लिप्ट मागीतल्याने दिघी गावाकडे ओढयाजवळील जाणा-या रोडच्या बाजुला निर्जन स्थळी अनोळखी इसमाने लघुशंके करीता थांबण्यास सांगुन त्याचेकडील चाकुचा धाक दाखवुन फिर्यादी यांच्या खिशातील विवो कंपनीचा मोबाईल, १८,०००/- रुपये रोख, तसेच ग्रे रंगाची जुपीटर गाडी क्र.एम.एच.१४/एच.ए.९१८१ असा एकुण ३६,०००/- रु. किंमतीचा मुद्देमाल जबरीने काढुन घेऊन अंधाराचा फायदा घेऊन पळुन गेला होता. तसेच तक्रारदार घाबरुन तक्रार देण्यासाठी पोलीस ठाणेस आले नाही. फिर्यादी तक्रार देण्यासाठी आल्यांनतर सदर घटनेबाबत तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दिघी पोलीस ठाणे येथे गु.र.क्रं. ४४३/ २०२३ भा.द.वि. कलम ३९२ मुं.पो.का.क. ३७ (१) (अ) सह १३५ अन्वये दि. २३/०९/२०२३ रोजी ०२.३६ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्री. संदिप डोईफोडे मा. पोलीस उपायुक्त परीमंडळ ०३, श्री. राजेंद्रसिंह गौर मा. सहायक पोलीस आयुक्त भोसरी एमआयडीसी विभाग, श्री. दशरथ वाघमोडे प्रभारी पोलीस निरीक्षक दिघी पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली दिघी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी पो.उप.नि. एस.एम. भदाणे व अंमलदार पो.हा. ७१३ फलके, पो.हा. ८०१ पोटे, पो.हा. ९५३ विंचु, पो.हा. १०२० कांबळे, पो.हा. ११६८ जाधव, पो.हा. १५७२ किरण जाधव, पो.शि. २०९४ जाधव, पो.शि. ३५५३ कसबे व पो.शि. ३३९१ भोसले यांनी आरोपीचे नांव पत्ता
माहिती नसताना घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचे मदतीने व आरोपी यांचे वर्णनावरुन रेकॉर्डवरील आरोपीची माहिती प्राप्त करून आरोपीचा दिघी आळंदी परिसरात शोध घेवून त्याचे नाव निष्पन्न करुन तीन तासाचे आत ताब्यात घेतले.
अटक आरोपीविरुदध खालीलपमाणे गुन्हे दाखल आहेत.
१) दिघी पोलीस ठाणे गु.र.क्रं. ३३५/२१ भा.द.वी. कलम ३७९,३४
२) दिघी पोलीस ठाणे गु.र.क्रं. ३१९/२१ भा.द.वी. कलम ३७९, ३४
३) दिघी पोलीस ठाणे गु.र.क्रं. २८५/२१ भा.द.वी. कलम ३७९, ३४
सदरच्या कारवाईत फिर्यादी यांची चोरीस गेलेली १५,०००/- रू.किमतीची ग्रे रंगाची जुपीटर गाडी क्र. एम.एच.१४ एच. ए. ९१८१ व गुन्हयात वापरलेला चाकु जप्त करण्यात आली असुन इतर मालमत्तेचा तपास सूरू आहे.
गुन्हयातील आरोपी अक्षय देवदत्त फालके वय २४ वर्षे रा. मौजे शाळेच्या पाठीमागे माऊलीनगर दिघी पुणे यास ता. २३/०९/२०२३ रोजी अटक करण्यात आली असून आरोपी आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. सदर गुन्हयाचा तपास सूरू आहे.