गून्हाविशेषशहर

खुन करून मुंबईत किन्नर बनुन राहणार्‍या आरोपीस म्हाळुंगे पोलीसांनी केले जेरबंद…

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २८ सप्टेंबर २०२३ म्हाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतील कुरुळी परिसरातुन इमस नामे सचिन हरिराम यादव वय १९ वर्षे रा.पुणे-नाशिक रोड कुरुळी ता. खेड जि.पुणे हा दि.२४.०८.२०२३ वा १४.०० घरातुन कामानिमित्त गेला व परत आला नाही. सर्वत्र शोध घेवुनही तो मिळुन न आल्याने वडील हरिराम यादव यांनी दि. २८/०८/२०२३ रोजी म्हाळुंगे पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग क्र. १३३ / २०२३ अन्वये तक्रार दाखल केली. एक तरुण मुलगा घरात कोणास काही एक न सांगता अचानक गायब झाल्याने मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे यांनी सदर प्रकरणाचा समांतर तपास करणेकामी गुन्हे शाखा युनिट १ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांना आदेश दिले. त्याप्रमाणे व.पो.नि. संतोष पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक इम्रान शेख, पो.हवा. फारुक मुल्ला, पो. हवा. प्रमोद हिरळकर, पो.हवा. अमित खानविलकर, पो.हवा. सचिन मोरे. पो.शि. विशाल भोईर, पो.शि. प्रमोद गर्जे, पो.शि. स्वप्निल महाले, पो.शि. नितेश बिच्चेवार असे पथक नेमुन सदर प्रकरणाचा समांतर तपास सुरु केला होता.
सदर प्रकरणाचा समांतर तपास करीत असताना नमुद पथकाने सदर मिसींग मुलगा याचे त्या दिवसभरात त्याने भेटी दिलेल्या प्रत्येक ठिकाणी जावुन त्याठिकाणावरील माहिती संकलित केली. तसेच त्या त्या ठिकाणवरील सीसीटीव्ही फुटेजेस मिळविले. तसेच सर्व तांत्रिक माहिती संकलित केली. सदर माहितीचे विश्लेषण करुन मिसींग मुलगा एम.आय.डी.सी. खेड परिसरात दोन अनोळखी इसमांबरोबर असल्याचे दिसुन आले.
त्यातील एक इसम हा रोहीत नागवसे हा मिसींग मुलाचे चाळीत भाडयाने रहात असल्याची माहीती मिळाली.
सदर दिवसापासुन तो सुध्दा गायब असल्याची माहिती मिळाली. सदरबाबत पो.हवा. फारुक मुल्ला यांना त्यादिवशी मिसींग मुलासोबत असलेला दुसरा इसम हा केज जि. बीड येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पो.उ.नि. इम्रान शेख यांचे नेतृत्वात पथकाने त्याठिकाणी जावुन त्या इसमास ओळखुन विचारपुस केली असता, त्याचे नाव गोरख जनार्धन फल्ले, वय ३२ वर्षे, रा. कानडी रोड, केज, बिड असल्याचे माहित झाले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने त्यादिवशी पुण्यात त्याचे मामेभाऊ रोहित नागवसे याच्यासोबत मिसींग मुलासोबत निमगाव परीसरात देवदर्शनासाठी जावुन त्या परीसरातील जंगलात मिसींग मुलगा यास दारु पाजुन त्याच्या डोक्यात दगडाने मारहाण करुन त्याचा खुन केल्याची माहिती दिली व त्याने रोहित नागवसे यास किन्नर / तृतीयपंथी बनण्यासाठी एका किन्नरकडे पाठवल्याचे सांगीतले. रोहित नागवसे हा वसई विरार परिसरात असल्याची माहिती प्राप्त केली. एका घरात किन्नर कडे चौकशी केली असता तिने तिचे नाव गायत्री असे सांगीतले. सदरबाबत संशय आल्याने अधिक सखोल चौकशी केली असता सदर किन्नर ही पाहिजे असलेला संशयित इसम रोहित नागवसे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांना गुंगारा देण्यासाठी व स्वतःचे अस्तित्व लपवण्यासाठी रोहित नागवसे हा गुन्हा घडल्यापासुन मुंबई / ठाणे परिसरात किन्नरच्या वेशात राहुन पोलीसांची दिशाभुल करीत होता. रोहित व गोरख दोघेही कर्जबाजारी झाल्याने पैशांसाठी यादव कुटुंबियास लुटण्याचा कट केला होता. त्याप्रमाणे दि २४/०८/२०२३ रोजी सचिन यादव यास एम.आय.डी.सी. खेड परिसरातील जंगलात नेवुन दारु पाजुन त्याच्या डोक्यात दगड घालुन खुन केल्याचे सांगीतले.
म्हाळुंगे पोलीस ठाणे मनुष्य मिसिंग क्र. १३३ / २०२३ मधील मिसिंग मुलगा सचिन हरिराम यादव वय १९ वर्षे रा.पुणे-नाशिक रोड कुरुळी ता.खेड जि. पुणे याचा खुन झाल्याचे निष्पन्न झाल्याने सदर दोन्ही आरोपी १) गोरख जनार्धन फल्ले, वय ३२ वर्षे, रा कानडी रोड, केज, बिड, २) रोहित शिवाजी नागवसे, वय २२ वर्षे, रा. जवळबंद, ता केज, जि. बिड यांना पुढील कारवाई कामी म्हाळुंगे पोलीस ठाणेच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पो. उप. नि इम्रान शेख, स.पो.फौ. शिवाजी कानडे, पो.हवा. फारुक मुल्ला, पो.हवा. प्रमोद हिरळकर, पो.हवा. अमित खानविलकर, पो.हवा. सचिन मोरे, पो.हवा. उमाकांत सरवदे, पो.हवा. बाळु कोकाटे, पो. हवा. महादेव जावळे, पो.हवा. सोमनाथ बो-हाडे, पो.हवा. मनोज कमले, पो.शि. विशाल भोईर, पो.शि. प्रमोद गर्जे, पो.शि. स्वप्निल महाले, पो.शि. अजित रुपनवर, पो.शि. मारोती जायभाये, पो.शि. तानाजी पानसरे, पो.हवा. नागेश माळी (टी. ए. डब्ल्यु), पो.शि. नितेश बिच्चेवार (सायबर क्राईम) यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!