
प्रतिनिधी रेणूका गायकवाड नाशिक दि. १७ ऑक्टोबर २०२५ नाशिक येथील सेंट्रल जीएसटी कार्यालयातील वरिष्ठ अधीक्षक हरिप्रकाश शर्मा याला सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. नाशिकमधील निफाड तालुक्यातील कसबे वणी येथील एका उद्योजकाकडून ५० लाख रुपयांची लाच मागणारी घटना उघडकीस आली असून, उद्योजकाच्या तक्रारीनंतर सीबीआयने तपास सुरू केला होता. हरिप्रकाश शर्माने या उद्योजकाला जीएसटी चौकशीतील अनियमितता न दाखवण्यासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. उद्योजकाला एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने २२ लाखांवर तडजोड झाली. पुण्यातील सेंट्रल जीएसटी कार्यालयात १४ ऑक्टोबर रोजी लाच स्वरूपातील पहिला हप्ता म्हणून ५ लाख रुपये घेताना सीबीआयच्या पथकाने त्याला अटक केली. त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू आहे. आरोपीच्या घरावर छापा टाकून १९ लाख रुपये रोख आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पुण्यातील न्यायालयाने त्याला १७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सीबीआयने नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणताही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी जीएसटीसंबंधी पैशांची मागणी करत असल्यास थेट सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. रुळी पडलेल्या या घटनेमुळे नाशिकमधील प्रशासनात चिंतेचा वातावरण आहे, आणि ही कारवाई भ्रष्टाचाराच्या विरोधातील कठोर संकेत म्हणून पाहिली जात आहे. ही घटना नाशिकमधील अनेक विभागांमधील लाचलुचपत वाढीची चौकशी करण्यासाठी सीबीआयची सतत कारवाई सुरू असल्याचा दाखला आहे. यामुळे भविष्यात सरकारी प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



