महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

“भीमशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळा” धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पिंपरीत संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १८ ऑक्टोंबर २०२३ दोन दिवसांन पूर्वी १५ ऑक्टोंबर २०२३ रोजी “भीमशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळा” व आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत कार्यकर्त्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त संपन्न झाला.
“भीमशक्ती सन्मान पुरस्कार वितरण सोहळा” हा कार्यक्रम ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक सभागृह, पिंपरी येथे आयोजित केला होता
सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांतजी हंडोरे साहेब ( माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य व
कायम निमंत्रित सदस्य, काँग्रेस वर्किंग कमिटी) हे प्रामुख्याने उपस्थित होते.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त,भीमशक्ती विद्यार्थी आघाडी पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा कमिटी यांच्या वतीने आयु. सुरज गायकवाड (अध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर व पुणे जिल्हा भीमशक्ती विद्यार्थी आघाडी) व आयु. गौतम गायकवाड ( पुणे जिल्हा संपर्क प्रमुख) मा. विजय हिंगे (पुणे शहर सचिव भीमशक्ती) यांनी सदरील कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
सदरील कार्यक्रमामध्ये विविध पुरस्कार वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. चंद्रकांतजी हंडोरे साहेब ( माजी सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र राज्य व कायम निमंत्रित सदस्य, काँग्रेस वर्किंग कमिटी) यांच्या हस्ते विविध क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे हांडोरे साहेब यांचे हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
यात भीमशक्ती समाजभूषण पुरस्कार मा. चंद्रकांताताई सोनकांबळे (मा. नगरसेविका पिं.चिं. मनपा), भीमशक्ती पुरस्कार मा. प्रा. बी.बी. शिंदे सर, भीमशक्ती धम्मभूषण पुरस्कार मा. बापूसाहेब गायकवाड, (मा.अध्यक्ष भारतीय बौध्द महासभा) भीमशक्ती कलारत्न पुरस्कार गायक धीरज वानखेडे, यांना मा. चंद्रकांतजी हंडोरे साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.
तसेच भीमशक्ती युवा गौरव पुरस्कार मा. धर्मराज साळवे, अजय गायकवाड, विनोद गायकवाड यांना, भीमशक्ती शौर्य पुरस्कार विजय ओव्हाळ, मनोज गरबडे, आकाश ईजगज यांना देण्यात आले.
तसेच भीमशक्ती युवा उद्योजक पुरस्कार विशाल कांबळे, प्रमिला चांदणे विक्रांत साळवे, आशिष भाई शेख यांना देण्यात आले.

भीमशक्ती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राध्यापक प्रमोद डोंगरदिवे सर, प्राध्यापक रमेश रणदिवे सर, प्राध्यापक सुनीता गजरमल, प्राध्यापक संजय मिस्त्री, प्राध्यापक प्रतिभा कांबळे यांना देण्यात आले.
भीमशक्ती डॉक्टर पुरस्कार डॉ.मनीषा गरुड यांना जाहीर करण्यात आले.
भीमशक्ती शिक्षण रत्न पुरस्कार राजन नायर, विशाल शेवाळे यांना देण्यात आले.
भीमशक्ती युवा वकील पुरस्कार ॲड. मिलिंद कांबळे ॲड. रवींद्र आरु यांना देण्यात आले आहेत.
भीमशक्ती प्रबोधन पुरस्कार राहुल खांडेकर यांना देण्यात आला.
भीमशक्ती सन्मान पुरस्कार प्रमोद शिरसागर, रमेश गायकवाड, गौतम पटेकर, विजय साळवे, अक्षय कसबे विनोद सरोदे, बाळासाहेब भालेराव, करण ताटे यांना देण्यात आले आहेत.
भीमशक्ती संघर्षशील संस्था पुरस्कार परिवर्तन यूवा एकता यांना देण्यात आला.
भीमशक्ती महिला सन्मान प्रतिभा बनसोडे मंदाकिनी गायकवाड, अंजना गायकवाड, अनिताताई सावळे व सरला उरवडकर यांना देण्यात आले.
यावेळी पत्रकारितेतील चांगल्या कामाची प्रशंसा करत मूकनायचे वरिष्ठ पत्रकार लक्ष्मण रोकडे यांना सन्मानित करण्यात आले. सदरील सर्व पुरस्काराचे वितरण माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व पुरस्काराचे वितरण माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती बाळासाहेब शिरसाट साहेब (मा.सभापती सातारा जिल्हा परिषद
व महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस भीमशक्ती सामाजिक संघटना व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी), मा.एन. के. कांबळे
(संपर्क प्रमुख महाराष्ट्र प्रदेश भिमशक्ती), मा. शशिकांत बनसोडे (भीमशक्ती मुंबई अध्यक्ष), मा.भाऊसाहेब सुरवाडे ( भीमशक्ती महाराष्ट्र संघटक), मा. अनिल उबाळे (महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भीमशक्ती विद्यार्थी आघाडी), आयु. मिलींद रणदिवे (मुंबई उपाध्यक्ष, भीमशक्ती सामाजिक संघटना), आयु. विजय डोळस (पुणे जिल्हा अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना), आयु. शिलार रतनगिरी (पुणे शहर अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना), आयु. आदिनाथ कांबळे (पुणे जिल्हा सरचिटणीस भीमशक्ती सामाजिक संघटना), आयु. अनील अवसरमल (पुणे शहर सरचिटणीस भीमशक्ती सामाजिक संघटना), आयु. अजय जानराव (युवक अध्यक्ष, भीमशक्ती पुणे शहर), आयु.परमेश्वर निसरगंध (पिंपरी चिंचवड शहर कार्याध्यक्ष), लक्ष्मण साळुंखे ( पुणे जिल्हा कार्याध्यक्ष), आयु. सुनील ससाणे ( पुणे जिल्हा सचिव), आयु. एकनाथ कसबे (पिंपरी चिंचवड शहर संपर्क प्रमूख), लहू साळुंके आदी कार्यकर्ते उपस्थित होते
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरज गायकवाड यांनी केले व सूत्रसंचलन भास्कर तिकटे, यांनी केले. यावेळी शिव, फूले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!