अनुवाद आपला न्युजच्या बातमीचा असर “राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर” समतल ब्रिज वरील नाव प्रशासनाच्या वतिने सुव्यवस्थित करण्यात आले..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०७ डिसेंबर २०२३ मागील महिन्यात दि. ०९ नोहेंबर २०२३ रोजी पुण्यश्लोक माता आहिल्याबाई होळकर समतोल ब्रिजवरील पुण्यश्लोक हे नाव गळून पडण्याच्या मार्गावर असलेलीची बातमी आपणच लावली होती. त्या बातमीचा असर असा झाला की लगेचच प्रशासनांने एका महिन्याचे आत हे पूलावरील पुण्यश्लोक माता अहिल्याबाई होळकर व त्यातील पुण्य ही अक्षरे पडलेली होती. या संदर्भात प्रशासनांने त्वरीत कामसूरू करून आता ते ठिकठाक केले आहे. या संदर्भात आवाज उठवणार्या “मल्हार आर्मी पुणे जिल्हा अध्यक्ष राहुल मदने” यांनी सांगीतले की समतोल ब्रिजची पाहणी करून त्याच्यावरील नाव हे सुस्थितीत नसल्याने आम्ही प्रशासनास तक्रार दिली ही वार्ता अनुवाद आपला न्युजला समजली व त्यांनी योग्यवेळी बातमी लावल्याने आमच्या मागनीची ताकद वाढली व हा विषय प्रशासना समोर जाताच तातडीने यावर कामाला सूरूवात झाली व आज हे नाव दूरूस्त करून ते आता सूस्थितीत आहे.
यावेळी मल्हार आर्मी पुणे जिल्हा अध्यक्ष मा. राहुल मदने, गणेश खरात, संतोष पांढरे, राजेंद्र पवार, कैलास जाधव, शिवाजी आवारे, बंडू मारकड, बंटी तरंगे, बिभीषण घोडके, विनोद बरकडे, दाजी वायकुळे, दिलीप गुळदगड, प्रभाकर कोळेकर, दादासाहेब कोपनर, प्रवीण मदने, नागनाथ वायकुळे, तानाजी कोपनर, कृष्णा वायकुळे, काका मारकड, बाळासाहेब कोपनर, अक्षय वायकुळे, दयानंद नरूटे, महेंद्र कोपनर, सतीश पाटील, दीपक वायकुळे, बालाजी कोपनर, उपस्थित होते.



