आंदोलनआर्थिकदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

बहुजन एकता आंदोलन महाराष्ट्र राज्यची पिंपरी चिंचवड मधे भव्य रॅली आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० ऑक्टोंबर २०२३ बाबासाहेबांनी शिक्षणाचा पायाभूत विचार करताना ज्यांना ‌शिक्षणाचे महत्त्व कळत नाही त्यांच्यासाठी सक्तीचा कायदा असावा असे म्हटले. शिवाय शिक्षण सरसकट सर्वांसाठी मोफत न करता जे फी देऊ शकतात त्यांच्याकडून ती घ्यावी म्हणजे सक्तीच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यास मदत होईल, असेही त्यांचे मत होते. पण या विषयाला बगल देवून राज्य सरकार खाजगीकरणाचा जो प्रकार करत आहे याने तळागाळातील गरीब जनतेला शिक्षणापासून वचित करू इच्छिते की काय असेच वाटते किंवा सरकारला प्रश्न विचारणारे कमी कसे करता येईल व भाजपा सरकार अशिक्षितांच्या मतावर बिनविरोध निवडून येत राहिल असे मत बहुजन एकता आंदोलन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र पवार यानी यावेळी मांडले बहुजन एकता आंदोलन महाराष्ट्र राज्यने भारत देशातील केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांनी खाजगीकरणाचा जो जी.आर. पास केला तो त्यांनी रद्द करावा व गोरगरीब जनतेला न्याय मिळण्यासाठी जनतेचा पैसा जनतेमध्ये वापरला पाहिजे तर हे भ्रष्टाचारी सरकार मोठ्या प्रमाणात जनतेकडून पैसा वसूल करून स्वतःच्या घशात घालत आहे या प्रशासनाला त्यांनी लाचार लबाड बनवलेला आहे मोठ्या प्रमाणात यांच्या हातून मोठे मोठे घोटाळे करून घेतात ठेकेदारांना दूहरी मोबदला मिळवून दिला जातोय आणि शिक्षणासाठी लागणारा खर्च जो इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून समाज सुधारण्यासाठी वापरला जाणारा खर्च ज्या प्रकारे वापरला पाहिजे जो खर्च त्या ठिकाणी येतो त्याचा हा वापर तिथं कुठल्याही प्रकारचा करत नाही आज पिंपरी चिंचवड शहरांमध्ये ७००० कोटीचा बजेट असताना त्या ठिकाणी जनतेला जो त्याचा आरोग्य असेल किंवा शैक्षणिक असेल प्रशासन त्या ठिकाणी त्या प्रकारचं काम करत नाही जर या एका पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा ७००० कोटीचे बजेट असेल तर या राज्याचे किती मग देशाचे किती मोठे बजेट आणि समाजासाठी किती खर्च केला पाहिजे तर जनतेतून किती कोटी रुपये जमा होत असतील याचा जर आपण विचार केला तर हे सरकार जनतेचे नसून भटाबामनांचं सरकार आहे. हे सरकार फक्त भ्रष्टाचार शिवाय दुसरं काही करू शकत नाही स्वातंत्र्यानंतर आज पर्यंतच्या कालखंडामध्ये या मनुवादी व्यवस्थेने फक्त जनतेला लुटण्याचं काम केल्याशिवाय दुसरं काही काम केलेलं नाही म्हणून काँग्रेसने जे केलं त्याच्या चार पटीने हे भ्रष्टाचारी बीजेपी सरकार करत आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट शब्दात सांगीतले होते, ” जे शिक्षण सक्षम बनवत नाही, समता आणि नैतिकता शिकवत नाही त्याला शिक्षण म्हणता येणार नाही .” शिक्षणामुळे समाजात जीवन निर्माण होते. त्यांच्या तत्त्वज्ञानात त्यांनी स्वाभिमान, आत्मविश्वास आणि मानवी अभिमान यांना अत्यंत महत्त्व दिले. पण बाबासाहेबांच्या या मताला भाजपाने तिलांजली दिली म्हणून या बीजेपी सरकारला धडा शिकवण्यासाठी म्हणून या बहुजन एकता आंदोलनच्या धोरणाच्या माध्यमातून या मेंग्या सरकारचं भ्रष्टाचारी सरकारचं महाराष्ट्र भ्रष्टाचारी सरकारचं मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करतो त्याच्या निषेधार्थ भव्य निषेद रॅली घेण्यात आली त्या रॅलीला उपस्थित असलेले मान्यवर पुढील प्रमाणे बहुजन एकता आंदोलन महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष माननीय राजेंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश प्रभारी श्रीकृष्ण वाघ, महाराष्ट्र प्रदेश संघटक अमर माने, पुणे जिल्हा अध्यक्ष संतोष सूर्यवंशी, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जी वानखडे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राहुल भाऊ रोकडे, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष रवी कांबळे, शहर सचिव राहुल भोसले, विधानसभा अध्यक्ष संजय गोपनारायण, महेश कांबळे लक्ष्मण मुधळे, दिलपाक सर, शरद कांबळे, हेमंत शिंदे, गिरीश सोनवणे, पिंपरी चिंचवड रिक्षा संघटना अध्यक्ष महेंद्र वाघ, उपाध्यक्ष राजेंद्र वाघ, मालतीताई वानखडे, मीनाताई वाघ, रेवती ताई गोपनारायण, संगीता कांबळे, युवा अध्यक्ष अजय वाघ, त्रितविक दत्ता जमादार, प्रशांत शिरसाठ, महादेव पाईकराव, सुभाष दोडे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

One Comment

Leave a Reply to Kaitlyn Walter Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!