गून्हामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

स्मार्टसिटी प्रकल्पातील सीसीटीव्ही कॅमेर्‍याच्या बॅटर्‍या, दुचाकी चोरणार्‍या टोळीस गुन्हे शाखा युनिट २ने केली अटक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २० ऑक्टोंबर २०२३ पिंपरी चिंचवड शहरात स्मार्टसिटी योजनेतुन नागरिकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमे-यांसाठी लावणेत आलेल्या जंक्शन बॉक्समधील एच बी एल कंपनीच्या १०० एच ए पॉवरच्या बॅट-या मागील काही महीन्यापासुन चोरीस जात असल्याने महत्वाच्या वर्दळीच्या चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. मा. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे साहेब यांनी सदर चोरीचे गुन्हयांचा छडा लावणेबाबत गुन्हे शाखांना आदेशीत केले होते.
गुन्हे शाखा पोलीस उप आयुक्त स्वप्ना गोरे व सहा. पोलीस आयुक्त सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २चे प्रभारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे अधिपत्याखालील गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार सातत्याने चोरटयांचा शोध घेत होते.
दिनांक १८/१०/२०२३ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पथक प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांचे मार्गदर्शनाखाली चोरीचे गुन्हयांचा समांतर तपास व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकींग करीत पिंपरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग चालू असताना युनिट २ चे सहा. पोलीस फौजदार शिवानंद स्वामी व केराप्पा माने यांना त्यांचे गोपनिय बातमीदाराकरवी बातमी मिळाली कि, निराधारनगर झोपडपटी पिंपरी येथील विजय कुंदवाणी यांच्या बिल्डींगच्या मोकळ्या पडीक जागेमध्ये काही इसम मोटर सायकलीवरुन बॅट-या घेवून येवून कोळशांचे पोत्यांखाली बॅट-या लपवुन ठेवत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली.
सदर ठिकाणी युनिट २च्या पथकाने लागलीच सापळा लावुन इसम नामे १) ओकांर सुरेश पवार वय १८ वर्षे रा. साई संतोष हौसिंग सोसायटी ए- १० पाचवा मजला रुम नंबर ५०२, मिलींदनगर पिंपरी पुणे २) सिध्दीकी वय २० वर्षे रा. संजय गांधीनगर साईबाबा मंदीराच्या समोर पिंपरी पुणे ३)जफर भुंगा कांबळे रा. निराधारनगर झोपडपटी पिंपरी पुणे व त्यांचे इतर ३ अल्पवयीन साथीदार यांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांचेकडे सखोल तपास केला असता त्यांनी सांगवी व निगडी परिसरातुन सीसीटीव्ही
जंक्शन मधील बॅट-या चोरल्याची तसेच चो-या करण्यासाठी निगडी व सांगवी भागातुन मोटर सायकली चोरल्याची कबुली दिली. आरोपी व विधीसंघर्षीत यांचेकडून बॅटरी चोरीचे व दुचाकी चोरीचे एकूण ०४ गुन्हे उघडकीस आले असुन सुमारे ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
खालील गुन्हे उघडकीस आले आहेत-
निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५९७ / २०२३ भादवि कलम ३७९ मधील- निगडी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ३५०/२०२२ भादवि कलम ३७९ मधील सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५३७/२०२३ भादवि कलम ३७९ मधील- सांगवी पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर ५०२/२०२३ भादवि कलम ३७९ मधील सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. श्री संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त श्री वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री सतिश माने यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र कदम, पोलीस उप निरीक्षक श्री गणेश माने व गुन्हे शाखा युनिट २ चे पोलीस अंमलदार शिवानंद स्वामी, केराप्पा माने, उषा दळे, देवा राऊत, आतिष कुडके, सागर अवसरे, अजित सानप, शिवाजी मुंढे, उध्दव खेडकर यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!