महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्साहात साजरी..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि.११ नोव्हेंबर २०२३ भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हे भारताचे पहिले शिक्षणमंत्री तर होतेच शिवाय ते उत्तम लेखक, अनुवादक आणि देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतलेले थोर स्वातंत्र्यसेनानीही होते, त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत शिक्षणाच्या बाबतीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यावेळी ते बोलत होते.

जयंतीच्या या कार्यक्रमास विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, विभागाचे मुख्य लिपिक वसीम कुरेशी, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी अझिज शेख, रुईनाझ शेख, हाजी दस्तगीर मणियार, अझहर खान,शाहबुद्दीन शेख, राजन नायर,संतोष जोगदंड,रफिक कुरेशी, व्ही. एम. कबीर, इद्रीस मेमन उर्फ खालू, साजिद शेख, युसुफ कुरेशी, शफीक काझी,करीम कुरेशी, आयन शेख,आफताब खान तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

मक्का येथे जन्म झालेल्या मौलाना अबुल कलाम आझाद यांनी दहा वर्षाहून अधिक काळ भारताचे शिक्षणमंत्री शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात काम केले. त्यांनी मराठी हिंदी इंग्रजी उर्दू आणि अरबी भाषांच्या अध्ययन केले,अनेक लेख लिहिले, तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी अनेकदा तुरुंगवासही भोगला. १९४२ च्या आंदोलनात त्यांचा सक्रीय सहभाग होता, त्यांची देशभक्ती आणि त्यांच्या उत्तम कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ त्यांना भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च किताब बहाल केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!