प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. २६ नोव्हेबर २०२३ संविधान दिनाच्या निमित्तानं शिवशाही व्यापारी संघ व शिवशाही भिमशाही सामाजिक सलोखा ऐक्य संघटनेच्या वतीने मनोगत व्यक्त करित असताना दाखले म्हणाले,
“स्वतःला काय हवे” त्याची निवड करण्याचे आणि आपल्या आयुष्याबाबत निर्णय घेण्याची पात्रता म्हणजे स्वातंत्र्य होईल व्यक्तीची ओळख हे त्याने केलेल्या निवडीतून स्पष्ट होत असते निवड करण्याच्या लोकांच्या अधिकारांमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसणे याला स्वातंत्र्य म्हणतात, असे संविधान दिनी लोकसेवक युवराज दाखले यांनी व्यक्त केले.
या वेळी “विचारांची लढाई” या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला महामानवांच्या विचारांच्या २० पूस्तकांचे दान मूकनायकचे वरिष्ठ पत्रकार व अनुवाद आपला न्युज चॅनलचे संपादक लक्ष्मण रोकडे यांना लोकसेवक युवराज दाखले यांनी केले. यावेळी ते बोलले की या अशा कार्यक्रमाने नक्कीच बाबासाहेबांचे व इतर सर्व महामानवांचे विचार घराघरात पोहोचायला मदत होईल आज सायंकाळी हा प्रश्नोत्तराचा कार्यक्रम पिंपरी “भिमसृष्टी” येथे होणार आहे. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून महामानवांच्या विचारांची ही पूस्तके नियोजीत प्रश्नांची उत्तरे देवून जिंकावीत व विचारांच्या या लढाईत सामिल व्हावे असे लोकसेवक युवराज दाखले यांनी यावेळी बोलले.