पूणे जिल्ह्यात किती झाले मतदान काय आहे तेथील मतदानाची टक्केवारी..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ नोव्हेंबर २०२४ पिंपरी चिंचवड आणि भोसरी मध्ये विधानसभा निवडणुकीमधे काल झालेले मतदान. भोसरी विधानसभा उच्चांकी ६१.१४ % चिंचवड विधानसभा ५६.७२ % तर पिंपरी विधानसभेत ५१.२९ % मतदान झाल्याचे दिसून आले. शहराला लागून असतानार्या मावळ विधानसभेत सर्वाधिक ७२.१० % मतदान झाले आहे. भोसरी व मावळातील परिवर्तनासाठी लोकांनी मतदान केल्याचे संकेत आहेत तशी टक्केवारीतील वाढ ही दिसते. काल झालेल्या मतदानाबाबत निवडणूक आयोगाने खालील चार्ट द्वारे झालेल्या मतदानाची टक्केवारी रात्री उशिरा जाहिर केली आहे. मतदार राजा यावेळी स्वंयमस्फूर्तीने मतदान केंद्रावर रांगालावून मतदान करताना दिसला. मतदान सूरळीत व्हावे म्हणून पोलिसयंत्रणा सज्ज होती. त्यांनी मोलाची कामगीरी यात पार पाडली. दोन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी निकाल यायला सूरूवात होईल. त्यावेळी खरे चित्रसमोर असेल हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.