पिंपरी विधानसभेसाठी पुन्हा बाल हट्ट पुरवण्याकरिता उमेदवारी दिली आहे का ?
पिंपरी विधानसभेचा गड कोण राखणार लढत खरी तिरंगी की दूरंगी काय आहेत या मागिल कारणे..
प्रतिनिधी पिंपरी विधानसभा दि. १६ नोव्हेंबर २०२४ काल डबू आसवानी यांचे सोबत योगेश बहल यांनी केलेली चर्चा व त्यानंतर अण्णा बनसोडे यांना निवडनूकीत सोबत राहण्याची ग्वाही हे मनोमिलन झाले या मनोमिलनाने पिंपरी विधानसभेतील सारी समिकरणे बदलनार असल्याचे दिसून येते. या मूळे राष्ट्रवादी (अ.प.) पक्षाचे उमेदवार अण्णा बनसोडे यांचे पारडे जड झाल्याचे दिसते आहे. तसे प्रचारात हजारो कार्यकर्त्यांच्या ताफ्यातून ही दिसते. सोबत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व यूतीचे पदाधीकारी व कार्यकर्ते ही सोबत असल्याने अण्णांची बाजू बळकट असल्याचे जाणवते. तशा शेकडो बातम्यातून ही दिसते. या उलट राष्ट्रवादी (श.प.) पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत-धर यांचा प्रचारात कमीतकमी कार्यकर्ते दिसतात कारण शोधले असता असे समजते की त्यांना पक्षातूनच विरोध होता कारण या तिकिटा करिता तिन तिन पदाधिकारी इच्छूक होते तशी त्यांची कार्यकर्त्यांनवर पकड ही होती पण त्यांना तिकिट नाकारल्याने त्यांचे कार्यकर्ते व पदाधीकारी नाराज असल्याचे दिसते. यूतीचे कार्यकर्ते ही सोबत दिसत नाहीत फक्त वरिष्ठ आल्यावर उपस्थित राहत असल्याचे दिसून येते. पण प्रचारादरम्यान या पक्ष दर्दींची गर्दी दिसत नाही. दूसरे असे की प्रचाराची क्वचित एखाद दूसरी बातमी दिसते. या उलट स्वराज्य पक्षाचे बाळासाहेब ओव्हाळ यांचा प्रचार पाहिला की वाटते ते खरोखर मनापासून लढताना दिसत आहे यावरून असे दिसते की खरी लढत ही अण्णा बनसोडे व बाळासाहेब ओव्हाळ यांच्यातच होणार आहे.
या मूळे काही प्रश्न उदभवतात राष्ट्रवादी (श.प.) पक्षाने पिंपरीत उमेदवार निवडताना काही चूक झाली का? इच्छूकांची भली मोठी यादी असताना कमजोर उमेदवार का दिला? की पून्हा एकदा पक्षाने बाल हट्ट पूरवला का? की पक्षात येताना उमेदवारीची अट घातली होती का? अशा अटीशर्ती घालून येणार्या उमेदवाराची सक्षमता तपासली गेली होती का? असे अनेक प्रश्न आम्हाला व पक्षातील व यूतीतील काही पदाधिकार्यांना व कार्यकर्त्यांना पडला आहे.