परिवर्तन विकास आघाडीची विधानसभेत पाठींब्या संदर्भात तातडीची बैठक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १० नोव्हेंबर २०२४ चार दिवसांन पुर्वी म्हणजे दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ बुधवार रोजी गुलाब पुष्प उद्यान, गवळी माथा, भोसरी येथे संपन्न झालेल्या मीटिंग मध्ये उपस्थित कार्यर्त्यांसमवेत चर्चा झाली. यावेळी या मीटिंगचे अध्यक्ष शाहीर गोविंद गाडे हे होते, सूचक मा. ईश्वर कांबळे, अनुमोदन प्रा.बी.बी.शिंदे यांनी केले. या बैठकीस प्रा. बी. बी. शिंदे, मा. उत्तम कांबळे, गोवींद गाडे, मा.धर्मा जगझाप, मा. सिरसट एल.व्ही., मा.मुकुंद रणदिवे, मा. बापू जगदाळे, मा. ईश्वर कांबळे, मा. माउली बोराटे, व्यंकटेश कुह्राडे, मा. दत्ता गायकवाड, मा. शिवाजी हाराळे, मा. आशोक जावळे, मा. सुनिता कांबळे, मा. दिलीप बनसोडे, मा. विठ्ठल लांडगे, मा. तुकाराम गव्हाणे, मा. रमेश कांबळे, मा. रविंद्र ननवरे, मा. शिवराज वाघमारे. इत्यादी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढील बैठक येणाऱ्या दिनांक १२/११/२०२४ मंगळवारी दुपारी ०१ वाजता, स्थळ :- डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) पिंपरी येथे ठेवण्यात आली आहे.
आपण सर्व ज्या वीधानसभेच्या उमेदवारांना पाठिंबा देणार आहोत. त्यांनी आपली खालील प्रमाने कामे करावीत, ही आपली प्रमाणीक अपेक्षा आहे.
१) येणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक मध्ये सध्या जो चार (४) प्रतीनीधीचा प्रभाग आहे तो रद्द करण्यात येऊन, तो एक प्रतिनिधी एक वार्ड करण्यासाठी शासनाकडून तसा जी.आर. पारीत करुन घेण्यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन, तो यशस्वी करावा.
२) सध्या शासनाच्यावतीने झोपडपट्टी पुनर्वसन योजना म्हणजेच S R A योजना सूरू आहे. त्यामध्ये शासनाकडून एक कुटुंब धारकांना केवळ ३३३ चौ. फुट टीडीआर देण्याचा जी. आर. आहे, तो रद्दबदल करुन तो कीमान जी.आर.५०० चौ. फुट कार्पेट एरिया मीळावा, या करीता शासनाकडून तसा जी.आर. पारीत करुन घेण्यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित करावा.
३ ) सध्या ज्या ६५००० प्राथमिक शाळा, व माध्यमिक शाळा, या महाराष्ट्राच्या सरकारने त्यांचे खाजगीकरण केले आहे, ते स्थगित करण्यात येऊन, त्यांचे पुन्हा शासकीयकरणं करुन तसा जी.आर.पारीत करुन घेण्यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित करावेत.
४) सध्या या आपल्या राज्यात शासनाने सर्वत्र, सर्व विभागातील नोकर भरती ही कॉन्ट्रॅक्टर पद्धतीने चालू केली आहे, ती पद्धत बंद करुन पूर्वी प्रमाणे कायम स्वरूपाची करण्यात यावी, यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन तसा जी.आर.पारीत करुन घेण्यासाठी प्रयत्न करावेत.
५) या पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील जीथे जीथे झोपडपट्टी आहे, तेथे औट पोस्ट पोलिस चौकी असावी यासाठी तसा जी.आर.पारीत करुन घेण्यासाठी सभागृहात प्रश्न उपस्थित करुन तसा जी. आर. काढण्यासाठी तळमळीने कार्य करावे.
यासाठी आपणास जो उमेदवार हे पाच मूद्दे लेखी वचननामा देईल, त्यालाच आपण जाहीर पाठिंबा देणार, असे येणाऱ्या उद्याच्या बैठकीत आपन मांडणार आहोत.
यासाठी आपणास नम्र विनंती आहे की,आपण
या बैठकीसाठी कसले ही कारण न सांगता वेळेवर उपस्थित राहुन मार्गदर्शन करावे. अशी विनंती परिवर्तन विकास आघाडीच्या पदाधिकार्यांच्यावतिने करण्यात आली आहे.



