भोसरीत झालेल्या पक्ष प्रवेशानंतर शंकरशेठ कुर्हाडे लगेच लागले कामाला..
बालाजी नगर इंद्रायणी नगर मधून लिड मिळवून देण्याकरिता शंकरशेठ कुर्हाडे यांनी पायाला भिंगरी बांधली
प्रतिनिधी भोसरी विधानसभा दि. १५ नोव्हेंबर २०२४ काल अजित गव्हाणेंच्या प्रचार फेरीत सिंहाचा वाटा उचलत शंकरशेठ कुर्हाडे यांनी संपूर्ण बालाजीनगर पिंजून काढत गव्हाणेंच्या प्रचाराचा खरा झंजावात दाखवला.
परवा भोसरीतील सभेत आदरणिय शरदचंद्र पवार याचे हस्ते पक्ष प्रवेश करताचजनू नवचैतन्य लाभल्या प्रमाणे शंकरशेठ सकाळ पासून पायाला भिंगरी बांधून प्रचार फेरीला उतरले संपूर्ण बालाजीनगर इंद्रायणीनगर पिंजून काढले.
यावेळी इंद्रायणी नगर बालाजी नगरच्या समस्या जाणून घेत सर्वांना विश्वास दिला की महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अजित गव्हाणे भोसरी विधानसभेवर निवडून येताच आपल्या बालाजी नगर व इंद्रायणी नगरच्या सर्व समस्या दूर होतील कारण ते टक्केवारी घेणारे नसून टप्याटप्याने काम करणारे, दिलेला शब्द पाळणारे, व्यक्तीमत्व आहे. त्यांना भोसरी विधानसभा व इतर ही विधानसभांचा अभ्यास आहे सर्वांच्या समस्या ते जाणतात पवार साहेबांनंतर दूसरा जानताराजा भोसरी विधानसभेला लाभला हे आमचे भाग्य आहे तेव्हां चिंता सोडा व गव्हाणेंना तूतारी वाजवनारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करा.
यावेळी सर्व माताभगिनींनी हाततील कामेसोडून गव्हाणेंना भरभरू विजयाचे आशिर्वाद दिले. यावेळी बालाजीनगर इंद्रायणीनगर मधील यूवक प्रचार फेरीत उपस्थित होते. अजित गव्हाणेंनी सर्व तरुण वर्गांना शिक्षणाचा उत्तम दर्जा व रोजगाराची हमी देण्याचे आश्वासन दिले. याच सोबत बालाजी नगरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचे ही आश्वासन दिले. यावेळी बालाजी नगर मधील वाढलेली गुंडशाही आणि दहशत संपूर्ण संपविण्याची ग्वाही दिली. भोसरी विधानसभेत शांतता प्रस्थापित करणारण्याचा मानस पूर्णकरून दाखवीन असे ही यावेळी त्यांनी सांगीतले.
यावेळी शंकरशेठ कुर्हाडे, महेंद्रजी सरोदे, दिनेश कुऱ्हाडे, पिंटू जाधव, सागर ओरसे, विकासजी देवकर, सुनील वाघमारे, नाना जाधव, भीमा लष्करे, मोहम्मदभाई शहा, रमजानभाई बांदेला, जावेदभाई पठाण, आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.