महिलांच्या गळयातील सोन्याचे दागिने खेचुन जबरी चोरी करणारे आरोपी व चोरीचे दागिने खरेदी करणाऱ्या सोनारांना गुन्हे शाखा युनिट ४ कडून अटक..

प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १९ डिसेंबर २०२३ चैन स्नॉचिंग १३ व वाहन चोरीचा ०१ असे एकुण १४ गुन्हे उघड. १६,३०,०००/- रुकिंचा मुद्देमाल जप्त दिनांक- ०५/१२/२०२३ रोजी यशोदा मेडिकल जवळ, महाराष्ट्र बँक चौक, सांगवी येथे एक महिला व तिचा पती असे सकाळी ०६:२० वा चे दरम्यान मॅर्निंग वॉक करत असताना एका काळया रंगाचे प्लसर मोटारसायकल वरुन आलेल्या दोन इसमांपैकी पाठी मागे बसलेल्या इसमाने सदर महिलेच्या गळ्यातील दोन तोळे वजनाचे मंगळसुत्र जबरदस्तीने हिसकावुन घेवुन गेल्याने सदर प्रकाराबाबत सांगवी पोलीस ठाणे, गु.र. नंबर- ६३१/२०२३ भा.द.वि. कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा नोंद होता. सदरचा प्रकार हा गंभीर स्वरूपाचा असल्याने मा. पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री. विनयकुमार चौबे यांनी सदर बाबत गुन्हे शाखेस लक्ष घालुन आरोपी अटक करून गुन्हे उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते.
त्यानुसार आम्ही स्वतः तसेच सपोआ (गुन्हे) सतिश माने, सपोआ बाळासाहेब कोपनर यांनी तात्काळ दाखल गुन्हयाचे घटनास्थळास भेट देवून गुन्हे शाखा युनिट-४ पिंपरी चिंचवड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संतोष पाटील यांना सदरचा गुन्हा उघडकिस आणण्याबाबत सुचना दिल्या होत्या.
त्यानंतर गुन्हे शाखा युनिट-४ चे अधिकारी व अंमलदार यांनी लागलीच घटनास्थळा पासुन आरोपी गेले त्या मार्गाचे सी.सी.टी.व्ही फुटेज पाहण्यास सुरुवात केली तेव्हा अशी माहिती प्राप्त झाली की सांगवी येथिल घटने नंतर काही वेळातच कासारवाडी येथे देखिल एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेवुन गेले असुन दोन्ही ठिकाणा वरील आरोपी हे एकच आहे.
तेव्हा गुन्हे शाखा युनिट-४ सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, आणि पोहवा / मोहम्मद गौस नदाफ, पोहवा / सुरेश जायभाये, पोशि/ सुखेदव गावंडे, पोशि/ धनाजी शिंदे, पोशि/ प्रशांत सैद, पोशि/ गोविंद चव्हाण असे स्टाफ यांनी सी.सी.टी.व्ही फुटेज चेक करुन पोहवा/नदाफ, पोशि/गावंडे, पोशि/शिंदे यांना मिळालेल्या माहिती वरुन आरोपी नामे आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार, वय १९ वर्षे, रा. खडकी स्मशानभुमी जवळ, रेल्वे पटरी समोर, महादेववाडी, खडकी, पुणे यास शिताफीने ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करुन त्याचे कडे सखोल तपास केला असता त्याने त्याचा साथिदार पाहिजे असलेला आरोपी नामे महादेव ऊर्फ महाद्या ऊर्फ अजय गौतम थोरात, रा-खडकी याचे सह म्हाळुंगे पोलीस ठाणे हद्दीतुन मोटारसायकल चोरी करुन सदर मोटारसायकल वरुन दाखल गुन्हा व्यतिरिक्त खालील गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तसेच आरोपी नामे आनंद लोहार याचे कडे खालील गुन्हयातील चोरी गेलेल्या मुद्देमाला बाबत चौकशी केली असता त्याने आरोपी नामे अक्षय अशोक मुरकुटे, वय-३१ वर्षे, रा-मुंजाबा वस्ती, धानोरी, पुणे व धिरज गोपाळ गवळी, वय-३१ वर्षे रा. घर नंबर ४२७ गवळीवाडी, खडकी, पुणे यांचे मार्फत विल्हेवाट लावली. तसेच सदर चोरीचे दागिने घेणारे आरोपी नामे गणपत जवाहरलाल शर्मा, वय ४४ वर्षे, धंदा-अभिषेक ज्वेलर्स रा. मांगल्य सोसायटी, एल्फिस्टन रोड, खडकी पुणे, दर्शन रमेश पारिख, वय-३२ वर्षे, धंदा-रमेश ज्वेलर्स रा ४०३, निता कॉर्नर, खडकी पुणे यांना विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने वरील सर्व आरोपींना दाखल गुन्हयात अटक करण्यात आले असुन त्यांचे कडुन खालील गुन्हयातील एकुण-२५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
१) सांगवी पोलीस ठाणे गु.र.नंबर-४१३/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२,३४
२) सांगवी पोलीस ठाणे गु.र. नंबर ५४७/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२,३४
३) सांगवी पोलीस ठाणे गु.र. नंबर-५८२/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४
४) सांगवी पोलीस ठाणे गु.र. नंबर-६३१/ २०२३ भा.दं.वि. कलम ३९२,३४
५) हिंजवडी पोलीस ठाणे गु.र. नंबर-१३१५/२०२३ भा.दं. वि. कलम ३९२,३४
६) भोसरी पोलीस ठाणे गु.र. नंबर ८४९/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२,३४
७) भोसरी पोलीस ठाणे गु.र. नंबर ९७९ / २०२३ भा.दं.वि. कलम ३९२,३४
८) भोसरी एमआयडीसी पो ठाणे गु.र.नंबर -४५०/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२.३४
९) भोसरी एमआयडीसी पो ठाणे गु.र. नंबर ४९९/२०२३ भा.दं.वि. कलम ३९२,३४
१०) चिखली पोलीस ठाणे गु.र. नंबर-७१२/ २०२३ भा.दं. वि. कलम ३९२, ३४
(११) म्हाळुंगे पोलीस ठाणे गु.र.नंबर ५२५/ २०२३ भा.दं. वि. कलम ३९२.३४
१२) म्हाळुंगे पोलीस ठाणे गु.र.नंबर-६१५ /२०२३ भा.दं.वि. कलम ३७९
१३) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र.नंबर-३११/ २०२३ भा.दं.वि. कलम ३९२, ३४
(१४) कोरेगाव पार्क पो ठाणे गु.र. नंबर-१३५/ २०२३ मा.दं. वि. कलम ३९२.३४
आरोपींचा पुर्वइतिहास
आरोपीचे नाव आनंद सुनिल साळुंखे उर्फ लोहार, वय १९ वर्षे, रा- खडकी स्मशानभुमी जवळ, रेल्वे पटरी समोर, महादेववाडी, खडकी, पुणे
१) खडकी पोलीस ठाणे, गु.र.नंबर ८५/२०२१ भा.दं.वि. कलम ३९५.५०४,५०६(२)
२) खडकी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- ३७५/२०२१ भा.दं.वि. कलम ३७९
३) खडकी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-३८०/२०२१ भा.दं. वि. कलम ३९२,५०६,३४
४) खडकी पोलीस ठाणे गु.र.नंबर- ३४९/२०२१ भा.दं.वि. कलम ३०७, ४ (२५)
५) खडकी पोलीस ठाणे गु.र. नंबर १३९/२०२२ भा.दं.वि. कलम ३९२
६) खडकी पोलीस ठाणे, गु.र. नंबर-१९२/२०२२ भा.दं. वि. कलम ३७९
७) खडकी पोलीस ठाणे, गु.र.नंबर-२०६/२०२२ भा.दं.वि. कलम ३५३,३०८
८) खडकी पोलीस ठाणे, गु.र. नंबर-२०७/२०२२ भा.दं.वि. कलम ३७९
९) सांगवी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- २४८/२०२२ भा.द.वि. कलम ३७९
आरोपीचे नाव- धिरज गोपाळ गवळी, वय-३१ वर्षे, रा. घर नंबर ४२७, गवळीवाडी, खडकी, पुणे
१) भोसरी पोलीस ठाणे गु.र.नंबर ८७/२०१० भा.दं.वि. कलम ३९४,३४
२) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र. नंबर ७९/२०१६ मा.दं.वि. कलम ३८०,४११,३४
३) विश्रांतवाडी पोलीस ठाणे गु.र.नंबर- ८३/२०१६ भा.दं.वि. कलम ३८०,४११,३४
४) मंचर पोलीस ठाणे, गु.र. नंबर – ११७/२०१६ भा.दं.वि. कलम ४२०,४६५,४६७,४६८
५) खडकी पोलीस ठाणे, गु.र. नंबर-१०४/२०१९ भा.दं.वि. कलम-३०२,३४,४५२, १४३,१४७, १४८.१४९
पाहिजे असलेल्या आरोपीचे नाव महादेव ऊर्फ अजय ऊर्फ महाद्या गौतम थोरात, रा. खडकी, पुणे
१) खडकी पोलीस ठाणे गु.र.नंबर- ३२/२०१६ भा.दं.वि. कलम ३९२,३४
.२) बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं-१३०/२१ भा.दं.वि.क ३९२,३४
३) बंडगार्डन पोलीस ठाणे गु.र.नं-१४३/२१ भा.दं.वि.क ३९५,३९७, मोक्का
४) स्वारगेट पोलीस ठाणे, गु.र.नं-१६४२ /२० मा.दं.वि.क ३९२.३४
| सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त मा. श्री. विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मा. श्री. डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी पोलीस उप आयुक्त गुन्हे, स्वप्ना गोरे मॅडम सपोआ गुन्हे, मा. श्री. सतिश माने सपोआ, बाळासाहेब कोपनर यांचे मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा, युनिट ४.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, पोउपनि आबासाहेब किरनाळे सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, अदिनाथ मिसाळ, पोहवा / प्रविण दळे, तुषार
शेटे, मोहम्मद गौस नदाफ, सुरेश जायभाये, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुनिल गुट्टे, पोशि/ प्रशांत सैद, धनाजी शिंदे, गोविंद चव्हाण, सुखदेव गावंडे यांनी केली आहे.



